गडचिरोली येथील विद्यार्थ्यांना मैत्री परिवारतर्फे 10 काम्‍प्‍युटर भेट.

 गडचिरोली येथील विद्यार्थ्यांना मैत्री परिवारतर्फे 10 काम्‍प्‍युटर भेट.

------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
नागपूर  प्रतिनिधि       
----------------------------------------------------------------

मैत्री परिवार संस्था, नागपूरतर्फे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथील स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्‍या विद्यार्थ्यांकरिता 10 कॉम्‍प्‍युटर भेट स्‍वरूपात देण्यात आले. श्री. रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नागपूरच्‍या सहकार्याने विद्यार्थ्‍यांना ही मदत करण्‍यात आली. 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल होते तर कार्यक्रमाच्‍या  अध्यक्षस्‍थानी मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, प्रमुख अतिथी मैत्री परिवार संस्थेचे सचिव प्रा. प्रमोद पेंडके होते. मंचावर स्‍वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजचे संस्‍थापक सतीश चिचघरे, प्राचार्य संगीता अंतमवार उपस्थित होत्या.

पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. त्‍यांनी यावेळी व्यक्तिमत्वातील गुणकौशल्याचा विकास करण्‍याचे विद्यार्थ्‍यांना आवाहन केले. प्रा. संजय भेंडे म्‍हणाले, सुपर कॉम्‍प्‍युटरचे जनक थोर शास्‍त्रज्ञ विजय भाटकर, देशाचे सरन्यायाधीश माधनंजय चंद्रचूड, जयंत नारळीकर, भास्कर हलानी, देवाजी तोफा अशा अनेक अनेक गणमान्‍य व्‍यक्‍ती छोट्या गावातून आलेली असून कठोर मेहनत, अभ्‍यास, चिंतन, मनन यांच्‍या जोरावर आज राष्ट्रहित जोपासत आहेत. डोळ्यासमोर त्‍यांचा आदर्श ठेवून स्वतःला घडवा, असे आवाहन त्‍यांनी केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश चिचघरे यांनी तर सूत्रसंचालन रितीका गोहने हिने केले. आभार कृष्णकांत मैंद या विद्यार्थ्‍याने मानले. कार्यक्रमाच्‍या सफलतेसाठी मैत्री परिवार संस्था, नागपूरचे कार्यकर्ते प्रकाश रथकंठीवार, प्रा. अनिल यावलकर, प्राध्यापक माधुरी यावलकर, अजय टेंभेकर, दत्ता शिर्के, रोहित हिमते, दिलीप ठाकरे तर गडचिरोली मैत्री परिवार संस्थेचे प्रमुख निरंजन वासेकर, अविनाश चटगुलवार, प्रदीप गुंडावार, डॉ. शंकर दरबार, दिलीप गडपल्लीवार, डॉ. अमीत साळवे, प्रकाश मुद्दमवार, अनिल तिडके, अश्विनी भांडेकर, चरडेजी, प्रा. संदीप बैस, संतोष मंथनवार यांचे तसेच, साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्‍या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.