तालुका विधी सेवा समितीचा लाभ कामगारांनी घ्यावा - न्यायाधीश एन.एम. बंडगर

 तालुका विधी सेवा समितीचा लाभ कामगारांनी घ्यावा - न्यायाधीश एन.एम. बंडगर

---------------------------------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------------------------------

कृष्णा व्हॅली चेंबरमध्ये कायदेविषयक चर्चासत्र संपन्न..

कुपवाड :-कृष्णा व्हॅली चेंबर व तालुका विधी सेवा समिती मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा प्राधिकरण कायदेविषयक माहिती चर्चासत्र कृष्णा व्हॉली चेंबर मध्ये आयोजित करण्यात आलेले होते. सदर चर्चासत्रामध्ये विविध कंपन्यातील 100 पेक्षा जास्त कामगार उपस्थित होते. या कार्यक्रमास मिरज न्यायालयाचे न्यायाधीश एन. एम. बंडगर, सह. दिवाणी न्यायाधीश एस.बी. नाईकनवरे,  तिसरे  सह. दिवाणी न्यायाधीश एन.बी. चव्हाण कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अविनाश पाटील ऑड एफ.जी. तांबोळी हे प्रमुख उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी केले. यावेळी बोलताना न्यायाधीश बंडगर म्हणाले की, तालुका विधी सेवा समितीचा लाभ कामगारांनी घ्यावा. विधी सेवा समिती ही तीन लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कामगारांना फौजदारी पासून सर्व प्रकारच्या खटला चालविण्यासाठी मोफत मदत करते. कामगारांनी व्यसनापासून अलिप्त रहावे तसेच स्वतःची प्रकृती व शरीर निरोगी ठेवावे. व्यसनापासून अलिप्त  राहिल्यास स्वतःचा व कुटुंबाचा फायदा होतो. कोणत्याही राष्ट्राची प्रगती हि श्रमशक्तीनेच होऊ शकते असेही न्यायाधीश बंडगर यांनी सांगितले.

तिसरे सह दिवानी न्यायाधीश चव्हाण म्हणाले की, कामगारांनी कंपनीमध्ये काम करीत असताना संरक्षण साधनांचा वापर करून काम करावे असे सांगितले .

कामगारांना कायदेविषयक संपूर्ण माहिती, कामगारांचे कोणकोणते खटले तालुका विधी सेवा समिती यांच्याकडून मोफत चालविले जातात याची संपूर्ण माहिती ऑड एफ.जी. तांबोळी  यांनी  चर्चासत्रामध्ये दिली.  सहा.पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी कुपवाड ओद्योगिक वसाहतीमधील उद्योग व कामगारांची माहिती सांगितली.आभार संस्थेचे संचालक रमेश आरवाडे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.