डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उध्वस्त केल्याच्या निषेधार्थ संविधान चौकात आंबेडकरी जनतेचे धरणे आंदोलन.
डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उध्वस्त केल्याच्या निषेधार्थ संविधान चौकात आंबेडकरी जनतेचे धरणे आंदोलन.
---------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र नागपूर प्रतिनिधी
---------------------------------------------------------------------
नागपूर प्रतिनिधी:डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे अभूतपूर्व धम्मचक्र प्रवर्तन करून नागपूरला ऐतिहासिक धम्मनगरीचे स्वरूप बहाल केले. नागपूर मनपाने या धम्मक्रांतीच्या सन्मानार्थ अंबाझरी तलाव लगत निसर्गरम्य स्थळी बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभारले. या भवनात ऐतिहासिक परिषदा, संमेलने व बैठका पार पडत होत्या. परंतु मनपाच्या दुर्लक्षितपणामुळे व भवनाचे जिर्णोद्धार न केल्यामुळे मनपातील कुत्सित मनोवृत्तीच्या जनप्रतिनिधींनी एम.टी.डी.सी.च्या संगनमताने भूमाफीयांच्या व्यावसायिक फायद्यासाठी वीस एकरात असलेल्या वास्तूला उध्वस्त करण्यात आले. या सभेला प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा.रणजीत मेश्राम म्हणाले की, आपल्याला काही मिळत नव्हतं तर आंदोलन करावी लागते.स्मारक समितीची जागा असो की पटवर्धन ची जागा असो ही जागा मिळण्यास ते अडचणी निर्माण करतात. नागपूर हे आंबेडकरवादी चळवळीचं केंद्र होतं.त्यामुळे नागपूर मनपा ने बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधले.व एका विकासाच्या हितासाठी ते पाडण्यात आले. हा समाजावर फार मोठा आघात असून त्यांचे हे षडयंत्र वेळीच ओळखून आपण आंदोलनास सिद्ध झाले पाहिजे. व या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून दोशींना त्वरित अटक करण्यात यावी व पूर्वीच्या वीस एकर जागेवर बाबासाहेब आंबेडकर भवनाचे पूर्ण निर्माण परिसर सौंदर्यासह करावे .आमदारांनी हिवाळी अधिवेशनात जीवितकार्य समजून लक्षवेधी मुद्दा उपस्थित करावा. असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.धनराज डहाट होते. ते म्हणाले की,१९ डिसेंबर ला विधीमंडळाचे अधिवेशन आहे. त्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्कारानिमित्त त्या ठिकाणी १९७२ मध्ये स्मारक निर्माण करण्यात आले. हे स्मारक सन २०१७ ते २०२१ पर्यंत कटकारस्थान रचून उध्वस्त करण्यात आले आहे. त्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी षडयंत्र करण्यात येत आहे. भवन बेकायदेशीररित्या पाडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.या आंदोलनासाठी बुद्धीबळ, मनुष्यबळ,व द्रव्यबळ आवश्यक असते असे बाबासाहेब म्हणाले होते. ते आमच्याकडे आहे.असे गौरवोद्गार काढून ते म्हणाले की,
वीस एकर जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उद्ध्वस्त करून जमीन हडपणाऱ्या मानसिकतेच्या विरोधात कठोर कार्यवाही करावी. तसेच त्याच जागेवर भव्य स्मारक उभारण्याच्या मागणीसाठी संविधान चौकात आज शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व रणजीत मेश्राम, डॉ. धनराज डहाट, जनार्दन मून,संजय जीवने यांनी केले.यावेळी आर.एस.अंबुलकर, मनोहर दुपारचे,बाळू घरडे, सिध्दार्थ उके, सुखदेव गडपायले, डॉ. शंकर कुडवे, रेवाराम शामकुवर, हरिश जानोरकर, आर के पाटील, संदेश खोबरे यांच्यासह मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते.
Comments
Post a Comment