भारतीय संविधान दिन संजीवन विद्यामंदिर पंढरीनगर येथे उत्साह साजरा.
भारतीय संविधान दिन संजीवन विद्यामंदिर पंढरीनगर येथे उत्साह साजरा.
दिघा :-26नोव्हेंबर हा दिन संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा करतात. तसेच दिघा विष्णू नगर येथील संजीवन विद्या मंदिर येथे पण भारतीय संविधान दिन उत्साह साजरा करण्यात आला.
यावेळी सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुरेखा नांदुरे मॅडम यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करण्यात आले.तसेच भारतीय संविधान उदेशीकाचे वाचन प्रमुख पाहुणे म्हणून असलेले रवि पी. ढवळे सर यांच्या कडून वाचन करण्यात आले.
यावेळी शाळेतील मुला मुलींनी संविधान दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका रिया कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका अश्विनी गोरे यांनी केली.
Comments
Post a Comment