कोल्हापूर शहरात प्रतिबंधित प्लॅस्टीलची खुले आम विक्री सुरू असल्याचे स्पष्ठ.
कोल्हापूर शहरात प्रतिबंधित प्लॅस्टीलची खुले आम विक्री सुरू असल्याचे स्पष्ठ.
------------------------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधि
अन्सार मुल्ला
----------------------------------------------------
कोल्हापूर (अन्सार मुल्ला):- कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपूर्वी प्रतिबंदीत प्लास्टिक विक्री जोरात सुरू आहे. तत्कालीन महानगर पालिका आयुक्त कलशेट्टी यांच्या कार्यकाळात आशा अवैध व्यावसायिक चोरीछुपे व्यवसाय करीत होते, मात्र त्यावेळी कारवाई मोठया प्रमाणात दाखल करण्यात आल्या होत्या. आता मात्र या अवैद्य प्लास्टिक व्यवसाय करणाऱ्याच्या मध्ये कसलीही भीती किंवा धाक राहिला नाही असेच म्हणावे लागेल. आज कोल्हापूर शहरात लक्ष्मीपुरी व्यापार पेठे मध्ये एक आशा व्यापाराचा पोल खोल करण्यात आला आहे. त्याच्या दुकानात लाखो रुपये किमतीचा प्रतिबंधित माल मिळून आला. या बाबत प्रसार माध्यमातून संबंधित कोल्हापूर महानगर पालिका आरोग्य निरीक्षण मनोज लोटे यांना फोन करून त्या दुकानाच्या समोर बोलावले मात्र त्यांच्या येण्याच्या काही वेळा आदी त्या दुकानदार याने तेथुन पळ काढला. त्याचा पाठलाग करून मनोज लोट यांनी त्याला दुकानातील माल जप्त करण्यासाठी प्रयत्न केले. आणि प्रसार माध्यमाना प्रतिक्रिया दिली. संबंधित इस्टेट अधिकारी यांना ते दुकान सील करण्यासाठी कळवण्यात देखील आले. मात्र अशा मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक विक्री करणाऱ्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पालिका आयुक्त यांनी स्वतः लक्ष दिले पाहिजे असे नागरिकांमधून मधून बोलले जात आहे.
Comments
Post a Comment