संविधान दिनानिमित्त चैत्यभूमीत केंद्रीय शिक्षक शिबिर सुरु.
संविधान दिनानिमित्त चैत्यभूमीत केंद्रीय शिक्षक शिबिर सुरु.
----------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------
भारतीय संविधानामुळे समाज शिक्षित व स्वाभिमानी झाला एस के भंडारे
मुंबई - दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा ) यांच्या केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या वतीने संविधान दिन दि. 26/11/2022 ते महापरिनिर्वाण दिन दि 6/12/2022 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ,चैत्यभूमी,दादर येथे आयोजित केलेल्या केंद्रीय शिक्षक शिबिराचे उद्घाटन संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस के भंडारे यांच्या हस्ते संपन्न झाले .शिबिरार्थीना श्रामनेर दिक्षा संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व भिक्खु संघाचे संघनायक भन्ते बी. संघपाल महाथेरो यांनी दिली. संस्थेच्या भिक्खु संघाचे भंते धम्मप्रिय ( कोषाध्यक्ष ) व भंते विशुद्धी बोधी ( सदस्य ) उपस्थित होते. अध्यक्षस्थानी अॅड. एस. एस. वानखडे (केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख व राष्ट्रीय सचिव ) होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधानकर्त्यांनी भारतीय संविधानात विविध तरतुदी केल्याने शिक्षण घेऊन आपला समाज शिक्षित होऊन मोठ्या पदावर काम करू लागला, स्वाभिमानी झाला .बौद्ध धम्मात समानता असल्यामुळे बहुजन समाज बौद्ध धम्म स्वीकारू लागल्याने येणाऱ्या 2025 मध्ये 10 करोड धम्म दीक्षा करण्याचा संकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव य आंबेडकर (ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष ) यांच्या नेतृत्वाखाली व डॉ हरिष रावलिया (ट्रस्टी चेअरमन ) चंद्र बोधी पाटील (ट्रस्टी /राष्ट्रीय अध्यक्ष )यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बौद्ध महासभेने केला आहे .मात्र समतेचे विरोधकांकडून संविधानच बदलून हिंदू राष्ट्र बनविण्याचा अजेंडा राबविला जात आहे. त्यासाठी आपण अधिक गतीने काम करावे लागेल, असे एस के भंडारे यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले . भंडारे पुढे असे म्हणाले की , आपले आदर्श तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार विचार वर्तणूक (Attitude) अत्यंत उच्च कोटीतील होते आणि कृती,काम अत्यंत शिस्तप्रिय (Discipline ) होते, म्हणून ते अढळ पदावर आहेत. त्यामुळे भारतीय बौद्ध महासभेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या आदर्शांच्या विचाराप्रमाणे काम करावे. यावेळी जगदीश गवई (राष्ट्रीय उपाध्यक्ष ) सुषमाताई पवार (राष्ट्रीय उपाध्यक्ष ) बी एच गायकवाड (राष्ट्रीय सचिव )उत्तम मगरे (अध्यक्ष ,मुंबई प्रदेश ) यांनी संविधान दिनाच्या व शिबीराच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या. संविधान दिनाच्या निमित्ताने त्रिसरण- पंचशील झाल्यानंतर संविधानाचे प्रास्ताविकेची सामूहिक शपथ घेऊन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या शिबिरास डी टी सोनवणे व एम डी सरोदे गुरुजी हे दोन वरिष्ठ केंद्रीय शिक्षक चिवर घेऊन निवासी केंद्रीय शिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.या शिबिरात सहभागी होण्यासाठी संस्थेने प्रथमच केंद्रीय शिक्षक प्रवेश परीक्षा घेतली होती.त्यात महाराष्ट्र व मुंबई मधून 185 कार्यकर्ते सहभागी झाले होते . त्यापैकी मेरिटमध्ये आलेल्या 52 जणांना या ऐतिहासिक शिबिरात प्रवेश मिळाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित असलेल्या न्यायाधिश दिशा पजई , अॅड. आम्रपाली मगरे ( संस्थेच्या कायदेशीर सल्लागार ) , अॅड. विकास साठे व निलेशाताई साळवी ( भिमराव साहेबांची मेहुणी ) यांचा संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी न्यायाधीश दिशा पजई यांनी संविधान दिनाचे औचित्य साधुन हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या सचिव सुनंदाताई पवार यांनी केले.या प्रसंगी बी एम कांबळे राष्ट्रीय सचिव, राजेश पवार राष्ट्रीय सचिव,केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या सुप्रियाताई कासारे उपप्रमुख अनिल मनोहर सचिव सुनिल बनसोडे सदस्य ,भरत गायकवाड सदस्य , केंद्रीय महिला विभागाच्या सुनंदाताई वाघमारे सदस्य, मुंबई प्रदेशचे विलास ढोबळे उपाध्यक्ष, प्रदिप कांबळे उपाध्यक्ष , चैत्यभुमीचे व्यवस्थापक तथा समता सैनिक दलाचे असि.लेफ्टनंट जनरल, रविंद्र गवई सरचिटणीस, महाराष्ट्राचे विजय कांबळे कोषाध्यक्ष , शामराव कांबळे सचिव,आनंदा सातपुते का.सचिव,धम्मयान चे सह संपादक एस के खैरे ,समता सैनिक दलाचे मोहन सावंत उपसचिव, इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment