बिद्री गावच्या सरपंचपदी श्री पांडुरंग चौगले यांची निवड.
बिद्री गावच्या सरपंचपदी श्री पांडुरंग चौगले यांची निवड.
-------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------
बिद्री ता.कागल गावच्या सरपंच पदी पांडुरंग ज्ञानू चौगले यांची निवड झाली. ग्रामपंचायत निवडणूक होऊन अडीच वर्षे पूर्ण झाली असुन. सरपंच आनंदी पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते.सरपंच पदासाठी श्री.चौगले यांचा एकमेव अर्ज आल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाली. मावळत्या सरपंच आनंदी पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.या कामी निवडणूक अधिकारी म्हणून बिद्री चे मंडल अधिकारी महादेव व्हरकट यांनी काम पाहिले.यावेळी बोलताना श्री.पांडुरंग चौगले यांनी सांगीतले कि उर्वरित जी विकास कामे आहेत ती पूर्ण करण्याचा माणस आपला आहे. या कार्यक्रमावेळी ग्रामविकास अधिकारी विष्णू पाटील, तलाठी नीलम दळवी,माजी सभापती जयदीप पोवार ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment