शाळकरी विद्यार्थ्यांचे रास्ता रोको आंदोलन.संग्रामपूर काथरगाव फाट्यावरील शाळकरी मुलांना कंडक्टर लोको बस मध्ये चढताना आणि उतरताना शिवीगाळ करतात

 शाळकरी विद्यार्थ्यांचे रास्ता रोको आंदोलन.संग्रामपूर काथरगाव फाट्यावरील शाळकरी मुलांना कंडक्टर लोको बस मध्ये चढताना आणि उतरताना शिवीगाळ करतात.

----------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 
स्वप्निल देशमुख
बुलढाणाजिल्हा प्रतिनिधि
----------------------------------------------------

विशेष बातमी

संग्रामपूर तालुक्यामधील काथरगाव पिंपरी येथील रयत क्रांती जिल्हाप्रमुख नानासाहेब पाटील यांनी एक निवेदन दिले होते, विभाग नियंत्रक बुलढाणा , यांच्यामार्फत

 आगार रा, प, म,(जळगाव जामोद) निवेदन मध्ये नमूद केले होते की आम्ही सर्व काथरगाव रहिवासी 700 ते 800 गावाची  लोकसंख्या असून  गावातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी गावापासून एक किलोमीटर अंतरावर त्या मुलांना काथरगाव फाट्यापर्यंत चालत जावे लागते काथरगाव फाट्यावर जाऊन या आठवड्यात बरेच वेळ एसटी थांबली नाही तसेच सकाळी मुलं व मुली नऊ-साडेनऊ ते दोन वाजेपर्यंत कोणतीही बस थांबत नसल्याने फाट्यावर शाळकरी मुलं-मुली  उभे राहतात त्यामुळे या मुलांचे शैक्षणिक खूप मोठे नुकसान होत आहे जर विद्यार्थींची परीक्षा वगैरे असल्यास त्यांचे काय हाल होतील सध्या या मुलांची प्रथम सत्र परीक्षा चालू आहे तसेच आमच्या गावामधील एकूण 40 ते 50 विद्यार्थी आहेत सर्व विद्यार्थी श्रीराम वानखडे विद्यालय पातुर्डा  फाटा येथे  शिकत आहेत महत्वाची की आमच्या गावातील रोड डांबरीकरण झालेले आहे व नदीवर पूल सुद्धा झालेला आहे तरी आपणास विनंती आहे की काथरगाव ते, पातुर्डा  फाटा सकाळी दहा वाजता सायंकाळी पाच वाजता अशा प्रकारे एसटी सेवा सुरू करण्यात यावी यासाठी नम्र विनंती दिनांक 12 /10/ 2022 रोजी  रयत क्रांती संघटना चे नानाभाऊ यांनी निवेदन दिले होते.

तसेच हे निवेदन आगार व्यवस्थापक जळगाव जामोद यांच्यामार्फत माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेब यांना व माननीय सदाभाऊ खोत माननीय कृषी राज्यमंत्री यांना सुद्धा दिले होते.

 तरीसुद्धा या नागरिकांचे म्हणणे आहे की आतापर्यंत यांनी एकही बस आमच्या गावापर्यंत पोहोचवली नाही आणि वरवट ते शेगाव जाणारी बस या काथरगाव फाट्यावर शाळकरी मुलांसाठी थांबत नाही आज दिनांक 17 नोव्हेंबर 2022 ला ही शाळकरी मुलं व मुली सकाळपासून निघालेले आहेत परंतु साडेतीन वाजत असल्यावर ही बस तिथे थांबली नाही आणि कितीक वेळा मुलं व मुली ते बसमध्ये बसताना कंडक्टर लोको त्या मूल व मुलींना शिवीगाळ पण करत असतात त्याकरिता आज रोजी काथरगाव फाट्यावर सकाळपासून आलेले मुल व मुले रास्ता रोको यांनी केले आहे त्यावेळेस काथरगाव येथील उपस्थित नागरिक व रयत क्रांती संघटनेचे नानाभाऊ पाटील यांनी माहिती दिली पत्रकारांना की आम्ही किती दिवसा अगोदर निवेदन दिल्यावर हे आमच्या मुलांना शाळेत ये जा करण्याकरिता खूप त्रास सहन करावा लागत आहे त्याकरिता आज रोजी आम्ही येथे रास्ता रोको केला काथरगाव येथील खूप नागरिकांची गर्दी केली होती आणि ये जा करणाऱ्या वाहकांची खूप रांगे,लागलेली होते त्यावेळेस उपस्थित तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार उलेमाले साहेब पीएसआय सोळंके साहेब व तामगाव पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी काथरगाव फाट्यावरती उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.