पत्रकाराला असभ्य वागणूक देणाऱ्या तमगाव पोलिसावर कारवाई करा ! ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख यांची मागणी.
पत्रकाराला असभ्य वागणूक देणाऱ्या तमगाव पोलिसावर कारवाई करा ! ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख यांची मागणी.
---------------------------------
बुलढाणा प्रतिनिधी
स्वप्निल देशमुख
---------------------------------
तामगाव पोलिसांच्या असभ्य वर्तणुकीला वरिष्ठांनी लगाम लावावा...
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तामगाव पोलीस स्टेशन मध्ये प्रामाणिकपणेने एखादे पत्रकार घटनेची माहिती (वृत्त संकलन करण्याकरिता गेल्यास) त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी नंदकिशोर तिवारी व कोल्हे हे असभ्य वागणूक देतात आणि अवैद्य धंद्याची बातमी लावल्यास गुन्हे दाखल करण्याची धमकी सुद्धा देतात आणि विशेष काही अवैद्य व्यवसायिकांना बोलावून त्यांना चहा, कॉफी सह त्याचे आदर सन्मान केला जातो. तरी नव्याने आलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी अशा पोलिसांना सामान्य नागरिकांसोबत ससोटीने वागण्याचा योग्य समज देऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी. जेणेकरून अशा कर्मचाऱ्यांमुळे पोलिसांची प्रतिमा मलीन होणार नाही. अपमान हा एका पत्रकाराचा नसुन आमच्या सर्वच पत्रकारांच्या लेखणीचा अवमान आहे. अशा बेजबाबदारपणे वागणाऱ्या पोलिसांमुळे पत्रकारांच्या कामात व्यथ्य निर्माण होतो , मग तो कोणत्याही प्रिंट मीडियाचा असो वा इलेक्ट्रानिक्स मीडियाचा असो तो आमच्याच मीडिया परिवाराचा अंश आहे. तामगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक ७ नोव्हेंबर 2022 रोजी आमचे पत्रकार मित्र ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांना पोलीस स्टेशन तामगाव येथील ठाणेदार श्री उलेमाले यांचे रायटर यांनी माहिती अधिकारातील माहिती घेण्याकरता बोलावले होते. आणि माहिती घेण्याकरिता आमचे पत्रकार दुपारी १२:३० वाजे दरम्यान पोलिस स्टेशन तामगाव येथे गेले असता तेथे ठाणेदार यांचे रायटर श्री ओइंबे यांनी ऑफिसमध्ये बोलावून माहिती दिली व त्याच दिवशी तामगाव पोलीस स्टेशन विरुद्ध अवैद्य धंद्याची बातमी प्रकाशित झालेली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ठाणेदार साहेबांसोबत चर्चा करण्यास थांबवले त्यावेळेस एकदमच चार-पाच पोलीस कर्मचारी ठाणेदार यांच्या ऑफिसमध्ये येऊन त्यापैकी पोलीस कर्मचारी नंदकिशोर तिवारी व कोल्हे यांनी आमच्या पत्रकार मित्रास अवमानित करत ऑफिसातून बाहेर या आणि तुम्ही अवैध्य धंद्याच्या बातमीत आमच्या ठाणेदार साहेबांचे नाव घेतले आपल्या काय एकाच तालुक्यात अवैध धंदे आहेत का पूर्ण जिल्हाभरात अवैध धंदे आहेत ते तुम्हाला दिसत नाही का आणि तुम्ही बातमीत नाव टाकल्यामुळे तुमच्या विरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करू शकतो अशी दमदाटी नंदकिशोर तिवारी यांनी केली आणि गुंड प्रवृत्ती सारखा पत्रकारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलीस कर्मचारी नंदकिशोर तिवारी व कोल्हे यांच्यावर लवकरात लवकर योग्य ते कार्यवाही होऊन सदर घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याचा आदेश व्हावा व प्रकरणाची सखोल चौकशी होऊन पत्रकार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अन्यथा युवा मराठा पत्रकार महासंघ व ऑल मीडिया प्रेस असोसिएशन कडून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्यात येईल असा इशारा ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलढाणा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Comments
Post a Comment