सातारा नगरपरिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड यांचेवर कारवाई करा.

 सातारा नगरपरिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड यांचेवर कारवाई करा.

---------------------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------------------

सातारा:- सातारा येथील नगरपरिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड ‌यांना ‌दैनिक सुपर भारत चे‌सातारा प्रतिनिधी यांनी दोन वेळा समक्ष भेटून तसेच लेखी तक्रार दाखल करूनही आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड ‌मनमानी कारभार करीत आहेत.  यापूर्वी सातारा येथील कारंजकरनगर, विलासपुर, कोयना सन्मित्र हौसिंग सोसायटी, सहजीवन सोसायटी येथील नगरपालिका क्षेत्रात वाढलेली झाडे झुडपे, स्वच्छता व औषध फवारणी करावी यासंदर्भात आमचे सातारा प्रतिनिधी किरण अडागळे यांनी पाठपुरावा केला होता यासंदर्भात योग्य ती कारवाई करावी म्हणून दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड यांची‌भेट‌ घेण्यासाठी कार्यालयात गेले असता साडेदहा वाजले तरीही कार्यालयात कोणी नव्हते म्हणून  आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड यांना फोन केला असता तु कोण पत्रकार, तु काय कलेक्टर आहेस का. मी कधी ही येईन अशि भाषा वापरली व पत्रकार म्हणून अपमान केला म्हणून आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड यांचेवर कारवाई करावी अशी मागणी आमचे प्रतिनिधी किरण अडागळे यांनी समक्ष सातारा नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित बापट व ऊपमुखयाधिकारी पराग कोडगुले यांचेकडे केली असता तात्काळ कारवाई करतो असे आश्वासन दिले.कारवाई दोन दिवसांत न केल्यास नागरिकांना घेऊन ‌आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.