छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारे राज्यपाल कोश्यारीचा जोडे मारून निषेध
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारे राज्यपाल कोश्यारीचा जोडे मारून निषेध.
----------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
स्वप्निल देशमुख
संग्रामपूर तालुका
------------------------------------------------------------------
महाविकास आघाडी वतीने जाहीर निषेध राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी व भारतीय जनता पार्टीचे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. याचे पडसाद राज्यभर उमटत असून संग्रामपूर तालुक्यात देखील संग्रामपुर तालुका शिवसेनेच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोशारी त्याचबरोबर सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमेस जोडे मारून वरवट बकाल बस स्थानकावर 21 नोव्हेंबर रोजी निषेध करण्यात आला .
शिवसेना व शिव प्रेमींनी केला जात असलेल्या या निषेध आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शिवप्रेमी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निषेधकर्त्यांतर्फे राज्यपाल भगतसिंह कोशारी त्याचबरोबर सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
या निषेध आंदोलनामध्ये शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते. यावेळी निषेधकर्त्यांतर्फे राज्यपाल भगतसिंह कोशारी त्याचबरोबर सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात यावेळी शिवप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment