मा शरद दिनकर पाडळकर ( मौजे- कासारवाडा ( पा)त्ता राधानगरी. यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार जाहीर.

मा शरद दिनकर पाडळकर ( मौजे- कासारवाडा ( पा)त्ता राधानगरी. यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार जाहीर.

---------------------------------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------------------------------

28 नोव्हेंबर हा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी शिक्षण आणि समाज परिवर्तनामध्ये मूलभूत व क्रांतिकारी कार्य केले आहे. त्यांच्या विचारांना आदर्श मानून शिक्षण व जनसेवेच्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करीत असलेले..... मा शरद दिनकर पाडळकर ( मौजे _कासारवाडा. (पा ) ता _ राधानगरी )............... यांच्या सामाजिक बांधिलकी मानून करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार जाहीर झाला आहे.

राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्काराचे वितरण सोमवार दि. 28 नोव्हेंबर, 2022 रोजी सायं. 5:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, लेखक व समीक्षक प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण, हातकणंगले लोकसभा मतदान संघाचे खासदार धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने (वहिनीसाहेब), डॉ. सुरेशराव जाधव, माजी आमदार राजीव आवळे, विजया कांबळे, डॉ. राजेंद्र दास, डॉ. अरुण भोसले, प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे, महादेव निर्मळे, सूरज वाघमारे या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती प्रकाशक अनिल म्हमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक सिद्धार्थ कांबळे, डॉ. नंदकुमार गोंधळी, यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेला लेखक डॉ. खंडेराव शिंदे,  डॉ. शोभा चाळके, ॲड. करुणा विमल, डॉ. दयानंद ठाणेकर, डॉ. कपिल राजहंस, प्रा. मिनल राजहंस, चंद्रकांत सावंत, निरंजन शिंदे, प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, शेषराव नेवारे, प्रा. श्रीकृष्ण अडसूळ, डॉ. सोमनाथ कदम, डॉ. पद्माकर तामगाडगे, सुरेश केसरकर, मोहन मिणचेकर, आचार्य अमित मेधावी, रंजना सानप, उद्धव पाटील, डॉ. स्वप्निल बुचडे, डॉ. अविनाश वर्धन उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.