कुपवाड चैतन्यनगर येथे नगरसेवक गजानन मगदूम यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या दत्त मंदिराच्या सभामंडपाचा भूमिपूजन संपन्न.
कुपवाड चैतन्यनगर येथे नगरसेवक गजानन मगदूम यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या दत्त मंदिराच्या सभामंडपाचा भूमिपूजन संपन्न.
-------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------
नगरसेवक गजानन मगदूम यांच्या प्रयत्नातुन मंजुर करणेत आलेल्या कुपवाड मधील चैतन्यनगर येथे श्री दत्त मंदिराच्या सभामंडपाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम जि.प.उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे व सभागृहनेत्या भारती ताई दिगडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
कुपवाड मधील विस्तारित भागात असलेल्या चैतन्यनगर मधील श्री दत्त कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला भाजपच्या महापालिकेतील गटनेत्या भारतीताई दिगडे,जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांच्या हस्ते मंदिराच्या नियोजित सभामंडप उभारणीच्या कामाला सुरुवात झाली.या कामासाठी प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक गजानन मगदूम यांनी आपल्या विकास निधीतून निधी मंजुर केला असुन बर्याच वर्षापासुन नागरिकांच्या मागणीला यश आले आहे .यावेळी कामाच्या नामफलकाचेही अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माधवनगरचे उपसरपंच बाळकृष्ण मगदूम,अरूण रुपनर विजय खोत आशुतोष धोतरे हणमंत सरगर उपस्थित होते.
नगरसेवक गजानन मगदूम यांनी कामाचा यशस्वी पाठपुरावा केल्याने काम मंजूर झाले याबद्दल त्यांचा नागरी सत्कार या भागातील नागरिकांच्या वतीने करण्यात आला नगरसेवक गजानन मगदूम यांनी या भागाचा कायापालट करण्यासाठी पुढाकार घेतला असून नेहमी लोकांच्या मदतीला धावून जाणारे ते लोकप्रतिनिधी असल्याचे डोंगरे यांनी सांगितले तर भारती दिगडे यांनी गजानन मगदूम हे एक आक्रमक नेतृत्व असून महासभेत ते नेहमी कुपवाडच्या प्रश्नासाठी झगडत असतात.
आमदार खासदार मंत्री आणि महापालिका यांच्या एकत्रित निधीतून कुपवाड शहरातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्व ते सहकार्य करू असं सौ दिगडे यांनी म्हटलं.या कार्यक्रमाला बजरंगनगर चैतन्यनगर शरदनगर श्रीनगर परिसरातील मंडळाचे पदाधिकारी आत्माराम फ़डतरे , भिमसेन नाटकरे ,नारायण चौगुले सुनिल राजमाने बाबासाहेब पांढरे महादेव मासाळ महादेव धुळगडे मारुती कलमडे लिंगाप्पा माळी रेवणाथ मासाळ राजेंद्र माने बाबासाहेब ओलेकर दादासो कोळेकर महेश फडतरे संतोष घसघसे दत्तात्रय पाटील धोंडीराम सरगर हिंदुराव पाटील रमेश माने बाबा जाधव बाळासाहेब मासाळ संतोष सुर्यवंशी विनायक धुळगडे अनिल कोरे नागरिक व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment