बिफ वाहतूक, बालविवाह, रस्त्याचे डांबरीकरण, वीट भट्टी मालकाकडून पैसे छापणारा "तो" खंडणीखोर कोण.
बिफ वाहतूक, बालविवाह, रस्त्याचे डांबरीकरण, वीट भट्टी मालकाकडून पैसे छापणारा "तो" खंडणीखोर कोण.
राजपुढारीपण करणाऱ्याचा गौण खनिजावर डोळा !
शेतकरी तयारीत, प्रकरण पोलिसात जाण्याची शक्यता उत्खननासंदर्भात
-------------------------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधी
नामदेव भोसले
-------------------------------------------
गौण खनिजातून राज्य शासनाला जास्तीत जास्त उत्पन्न स्वरूपात सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून शिरोळ तालुक्याकडे पाहिले जाते. त्यामुळे सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर वेगवेगळ्या संघटना व समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या प्रतिनिधींची यावर बारकाईने लक्ष असते. नुकतेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गौण खनिज सकारात्मक वक्तव्य करून शासन लवकरच निर्णय जाहीर करेल असे स्पष्ट केल्यामुळे राजपुढारीपण करणाऱ्याच्या भुवया उंचावल्या आहेत. जयसिंगपूर शहरात अर्धवेळ वावरणाऱ्या 'त्या' राजमार्ग निधी, फंड संचालकाने मंत्र्यांच्या वक्तव्याबद्दल संतोष (धन्यता) व्यक्त करीत डोळे व कान टवकारले आहेत. सर्वात पुढे आहे, असे सांगणारा हा समाजप्रबोधनकार प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या कारणातून गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांची पाचवी पुजायला जातो. शेकड्यातून खंडणीची सुरुवात केलेल्या या बहाद्दराने आता लाखोंची भाषा सुरू केल्याची चर्चा आहे. वेळ पडली तर गतवर्षीप्रमाणे मालकाचे नाव पुढे करून लाखोंचा ढपला पाडणारच...! अशी गर्जना जयसिंगपूर बस स्थानकाच्या मागील एका हॉटेलमध्ये बसून केली आहे. त्याच्या या धाडसी वक्तव्यामुळे इतर समाज प्रबोधन करणारे घटक आवाक झाले असून जयसिंगपूर शहरात खळबळ उडाली आहे. बिफ वाहतूक, बालविवाह, रेशन धान्य काळाबाजार, उदगाव ते केपीटी पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण, वीट भट्टी मालक ते लाल माती विक्री करणारे शेतकरी, गोडाऊनला आग, औद्योगिक कामगारांचा प्रश्न, पोलीस ठाणे अंतर्गत बेकायदा सुरू असलेल्या व्यवसायातून मलई, शेअर मार्केट मधील फसवीगिरी, दूध-खवा-बासुंदी व्यवसायातील काळाबाजार यासह अन्य विषयातून राजपुढारीपणाची भिती घालून लाखोची माया गोळा करून नामानिराळा असल्याचा आव आणणाऱ्या समाज प्रबोधकाने आपले साथीदार नदीकाठच्या गावात पाठवले आहेत, समाज प्रबोधकाच्या धूर्त खेळी मोडून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे त्या प्रबोधकाला पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
Comments
Post a Comment