मारुती चितमपल्ली यांना समाजरत्न समाजसेवा सन्मान प्रदान.
मारुती चितमपल्ली यांना समाजरत्न समाजसेवा सन्मान प्रदान.
-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
वर्धा, 14 नोव्हेंबर 2022: इंटिग्रेटेड सोसाइटी ऑफ मीडिया प्रोफेशनलच्या वतीने अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांना समाजरत्न समाजसेवा सन्मान प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि मानपत्र स्वरूपातील हा सन्मान चितमपल्ली यांना सोलापूर येथील त्यांच्या निवासस्थानी 12 नोव्हेंबर इंटिग्रेटेड सोसाइटी ऑफ मीडिया प्रोफेशनलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व वर्धा जिल्हा वन्य जीव संरक्षक कौशल मिश्र, केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष बी एस मिरगे, वर्धा येथील अधिवक्ता नीलकंठ हूड, माजी सैनिक संघटनेचे यशवंत भांडेकर, चितमपल्ली परिवारातील भूजंग, तनेश, विशाल व श्रीनिवास चितमपल्ली, सोलापूरचे वन्यजीव फोटोग्राफर शिवानंद हिरेमठ यांच्या उपस्थितीत देण्यात आला. सोसायटीचे सहावे वार्षिक अधिवेशन 11 व 12 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात चितमपल्ली यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार होता परंतु प्रकृतीच्या कारणाने ते उपस्थित राहू शकले नाही.
चितमपल्ली यांना हा सन्मान पक्षी सप्ताहात (05 ते 12 नोव्हेंबर) वन्यजीव आणि पर्यावरण क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी प्रदान करण्यात आला आहे अशी माहिती लखनौ येथील इंटिग्रेटेड सोसाइटी ऑफ मीडिया प्रोफेशनलचे चेयरमॅन चंद्रशेखर यांनी दिली. चितमपल्ली हे सध्या सोलापूर येथे वास्तव्यास असून वयाच्या 91 व्या वर्षातही ते उमेदिने लेखन कार्य करत आहेत. त्यांची 25 हून अधिक पुस्तकें प्रकाशित झाली असून सध्या ते वृक्षकोषाचे काम पूर्ण करत आहेत. त्यांचे वर्धा शहराशी अत्यंत जवळचे व घनिष्ठ नाते राहिले असून ते येथील महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात 3 वर्षाहून अधिक काळपर्यंत वास्तव्यास होते. वनअधिकारी म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात काम केले आहे.
Comments
Post a Comment