सांगली जिल्हाअधिकारी यांना युवा पत्रकार संघाचे पत्रकार हिताचे मागण्या मान्य व्हावे असे निवेदन देण्यात आले.

 सांगली जिल्हाअधिकारी यांना युवा पत्रकार संघाचे पत्रकार हिताचे मागण्या मान्य व्हावे असे निवेदन देण्यात आले.

-----------------------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------------------

  युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य तर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून पुढील राज्य हिवाळी अधिवेशनामध्ये पत्रकारांच्या हिताचे मागण्याचे निवेदन मांतडा राजा दयानिधी सांगली जिल्हाअधिकारी सो...यांना  शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले.

निवेदनात - भारतीय राज्यघटनेप्रमाणे देशातील पत्रकार बंधू-भगिनींना पत्रकारांना सन्मान, सुरक्षा,न्याय हक्क आणि त्यांच्या स्वावलंबनाचा अधिकार आहे.

नागपूर हिवाळी  अधिवेशनाच्या 

 अध्यक्षांना उद्देशून मागणी पत्र. जिल्हाधिकार्‍यांच्या मार्फत संघाकडून  प्रत्येक जिल्ह्यातून पत्रक पाठविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

 निवेदनात संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे आणि  प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष

   यांच्या सल्ल्यानुसार निवेदन व मार्गदर्शक तत्त्वांवर पत्रके पाठवण्याची मोहीम हाती घेत आहे,

तरी मा. जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन हिवाळी अधिवेशनामध्ये पाठवून सहकार्य व सकारात्मक विचार व्हावा असे म्हटले आहे.

 

पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आमच्या मागण्या

१] केंद्र आणि राज्य पातळीवर माध्यम पत्रकार भवन स्थापन करण्यात याव्यात. ते महाराष्ट्र सदन  दर्जाचे असावे,

 २] केंद्र व राज्य स्तरावर पत्रकार माध्यम कल्याण मंडळाची स्थापना करावी. 

३] तहसील ते जिल्हास्तरापर्यंत मीडिया सेंटरची इमारत बांधण्यात यावी. 

४] सर्व राज्यांमध्ये पत्रकार संरक्षण कायदयाची अमलबजावणी करावी.


 ५] पत्रकार कुटुंबीयांना व  पत्रकार बांधवांना पत्रकार सुरक्षा भत्ता म्हणून दरमहा मानधन  देण्यात यावे.


६] समान संधी, समान हक्क, समान दंडसंहिता, समान शिक्षण संहिता, एकसमान पोलीस संहिता, एकसमान आरोग्य संहिता, एकसमान न्यायिक संहिता, समान नागरी संहिता, एकसमान प्रशासन संहिता यावर ठोस कायदे केले पाहिजेत.

 ७] पत्रकारांच्या छळाची व हल्ल्याची  नोंद करण्यासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर पत्रकार श्रवण पोर्टल आणि हेल्पलाइन क्रमांक सेवा सुरू करावी.


 ८]  प्रसारमाध्यमांशी संबंधित प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा न्यायालय स्तरावर स्वतंत्र जलदगती न्यायालये निर्माण करावीत.


९] पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या अपघाती मृत्यूवर सरकारने किमान 25,00,00 रुपये (25 लाख) मदत देण्याची, तसेच पत्रकारावर अवलंबून असलेल्यांना सरकारी नोकरी देण्याची तरतूद लागू करावी.

 १०] महिला पत्रकारांचा सन्मान, सुरक्षा आणि स्वावलंबन लक्षात घेऊन महिला पत्रकार वसतिगृहे बांधली जावीत.


११] 18 ते 60 वर्षे वयापर्यंतचे पत्रकार आणि प्रसार माध्यमातील कर्मचारी  यांना रोडवेज बस, ट्रेन, विमान या प्रवासादरम्यान तिकिटाच्या दरात 50% सवलत देण्यात यावी व टोल टॅक्स मोफत प्रवास पत्रकारांना जारी करण्यात यावे. 

१२]  देशातील सर्व अपरिचित पत्रकारांच्या नावांची यादी करून त्यांना तत्सम अधिकारी मार्फत  मान्यता प्रमाणपत्र/ ओळखत पत्र देण्यात यावे आणि त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी आयुष्मान भारत योजनेशी जोडण्यात यावे. 

१३] सर्व पत्रकार आणि  माध्यम कर्मेयांना व्ही आय पी दर्जा देण्यात यावा.

१४] विधान परिषद पत्रकार मतदारसंघ गठीत करण्यात यावा व विधानपरिषदेच्या विहित जागांमध्ये पत्रकार आमदाराचा कोटा निश्चित करण्यात यावा व पत्रकार आमदाराची निवड ही तंतोतंत विधानपरिषदेचे शिक्षक व पदवीधर आमदार या नियमानुसारच करण्यात यावी.मतदार अनुभवी पत्रकारांची यादी तयार करून पत्रकार आमदाराची निवडणूक घेण्यात यावी.

१५] राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये  नवीन नवोदित पत्रकारांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारावीत.

 लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करण्यासाठी वरील मागण्यांचा विचार करून राज्यात अंमलबजावणी करण्याच्या सूचना द्याव्यात

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पत्रकार व पत्रकारांच्या कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी  कार्यरत असुन संपुर्ण महाराष्ट्र राज्यात नाव लौकिक मिळविला आहे.

 तरी आमच्या मागण्या 

लवकरात लवकर मान्य व्हाव्यात 

असे जिल्हाधिकारी यांना 

शिष्टमंडळातर्फे  विनंती करण्यात आली .

जिल्हाधिकारी यांनी तुमच्या मागण्यांची निवेदन पुढील राज्य हिवाळी अधिवेशनांमध्ये पाठवून देऊन पत्रकारांच्या 

 भावना शासनास कळवू असे ग्वाही दिली.

शिष्टमंडळात पुढील पदाधिकाऱ्यांची सह्या आहेत.


संस्थापक अध्यक्ष: शिवाजी शिंगे, 

 कार्यकारी संपादक : साप्ताहिक राष्ट्रप्रथम


विभागीय अध्यक्ष: कौतुक नागवेकर,

उपसंपादक : मिडीया कंट्रोल न्यूज चॅनेल 


१)  सांगली जिल्हा अध्यक्ष: प्रविण मिरजकर,

बिग मराठी न्यूज चॅनेल 


 २) महीला सांगली जिल्हा अध्यक्ष: मीनाज तांबोळी,

  जिल्हा प्रतिनिधी : फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 


 ३)  शहर अध्यक्ष: संग्राम मोरे

संपादक : साप्ताहिक जनतेचा स्टार


४) राज्य सदस्य: इरफान बारगीर

उपसंपादक : दैनिक तुफान क्रांती


५) संपर्कप्रमुख: निलेश मगर

संचालक : मिडिया कंट्रोल न्यूज चॅनेल

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.