सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख कराड येथील गांजा विक्रीवर लक्ष देणार काय ?
सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख कराड येथील गांजा विक्रीवर लक्ष देणार काय ?
-----------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------
सातारा :- सातारा जिल्ह्यातील कराड येथे सध्या गांजा विक्री गुपचूप पुणे चालू आहे. अवैध व्यवसायांना थारा न देता कारवाईचे आदेश सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी यापूर्वी दिल्यानंतर अवैध व्यवसाय नियंत्रित आहेत परंतु कराड येथे मात्र सध्या उलट परिस्थिती पाहव्यास मिळत आहे. सध्या कराड येथे एक लाख रुपये किलो दराने गांजा विक्री चालू आहे. यासाठी पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. सहा ग्रॅम एका पुडीला चारशे रुपये घेतात. सध्या या दरात चौपटीने वाढ झाली आहे.
शहरातील मध्यवर्ती पेठेत बुधवारी सर्रास गांजा विक्री सुरू आहे. काहीजण पहाटे दुचाकीवरून गांजा विक्री करत असतात. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या इमारतीजवळ, जुन्या कोयनापुलाखालील भाग, कोयनेशर, कळमेश्वर मंदिराचा खालिल भाग, टेंभू कडे जाणारा भाग, वाखाण भागातील मोकळा रस्ता, या भागात गांजाची नशा करणाऱ्यांचा ठिय्या असतो. याचा आसपासच्या महिलांना खूप त्रास होतो. पोलिस कर्मचारी मात्र महिन्यात ठराविक तारखेला जातात. म्हणून या संदर्भात पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पुढाकार घ्यावा असे मत नागरिकांनी आमच्या चॅनलच्या प्रतिनिधी किरण अडागळे सातारा यांचे कडे व्यक्त केले.
Comments
Post a Comment