२६ नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या जल्लोषात साजरा व निबंध स्पर्धाचे बक्षीस वितरण.
२६ नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या जल्लोषात साजरा व निबंध स्पर्धाचे बक्षीस वितरण.
-----------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------
दिघा :-विष्णू नगर नवी मुंबई येथे २६ नोव्हेंबर या दिवशी संविधान दिनाचे आयोजन केले होते. विभागातील नालंदा बुद्ध विहार या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमांना वंदन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. रबाले एमआयडीसी पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षका सन्मा.किरण पाटील मॅडम यांच्या शुभहस्ते लहान मुले आणि तरुण मंडळीना संविधान उद्देशिकेच्या प्रतींचे वितरण करण्यात आले.तसेच सन्मा.किरण पाटील मॅडम यांनी उपस्थित नागरिकांना संविधानाचे महत्व या विषयावर संबोधित केले.त्यानंतर उद्देशिकेची शोभा यात्रा काढण्यात आली.सदर शोभा यात्रा विभागातील रामजी आंबेडकर नगर, विष्णूनगर, पंढरीनगर, ईलठणपाडा,सुभाष नगर या ठिकाणाहून पुन्हा नालंदा बुद्ध विहार येथे आली.त्यानंतर निबंध स्पर्धेत ज्या मुलांनी सहभाग घेतला होता शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप,तसेच खाऊ आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
सदर प्रसंगी मान्यवरांची मार्गदर्शन पर भाषणे झाली.लहान मुलांनी देखील संविधाना बद्दल आपल्याला असलेली माहिती भाषणातून सांगितली.सदर कार्यक्रम फारच उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रमात समाजातील प्रत्येक जाती-धर्म आणि विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील हजेरी लावली आणि सामाजिक एकोप्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमासाठी विभागातील नागरिकांकडून पक्षभेद बाजूला सारून एक कमिटी गठीत करण्यात आली होती.सदर कार्यक्रम पार पाडण्यास कमिटीतील पदाधिकाऱ्यांचे तसेच सदस्यांचे मोलाचे योगदान होते.
कमिटीचे श्री.बाबुराव गायकवाड,सौ.हवाईबाई गायकवाड, श्री.अंगद कांबळे, उपासिका ताराबाई बनसोडे यांच्यासह कमिटीतील सदस्य श्री.हर्षवर्धन गायकवाड, श्री.सागर सोनकांबळे,श्री.नितीन बनसोडे,श्री.सतीश शिनगारे,श्री.मुकेश गायकवाड, श्री.सचिन मगर या सर्वच कार्यकर्त्यांसह उपस्थित राहीलेल्या नागरिकांचे मोलाचे सहकार्य मिळाले आणि कार्यक्रम उत्साहात पार पडला.
Comments
Post a Comment