ACC कंपनीने केला चार दलित कामगारांवरती अत्याचार.

 ACC कंपनीने केला चार दलित कामगारांवरती अत्याचार.

-------------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

मंगेश तिखट

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

-------------------------------------------------

 : दहा वर्षांचा PF भरलेला नव्हता म्हणुन केले होते आंदोलन तर गेल्या आठ ते दहा महिन्यापासून कामावरून केले बंद

न्याय मिळाला नाही तर नागपूर अधिवेशनात करु आंदोलन जर तिथे सुद्धा कामगारांना न्याय मिळाला नाही तर मंत्रालयासमोर करु आंदोलन 

सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव 

अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर 


घुग्घुस जिल्हा चंद्रपूर येथील ACC चांदा सीमेंट कंपनी नकोडा घुग्घुस येथील न्यु पॅकिंग हाऊस ठेकेदार तिरुपती कंस्ट्रक्शन नितीन शर्मा यांनी 2011  गेल्या दहा वर्षांपासून कामगारांचा PF भरलेल्या नव्हता हा ठेकेदार कधी दोन महिने तर कधी सहा महिने असा PF चा अफरातफर गेल्या दहा वर्षांपासून करत होता.


हे बघता कामगारांनी आपला PF ठेकेदार जमा करत नसल्याने सर्व कामगारांनी मिळुन 2014 मध्ये PF कार्यालय चंद्रपूर व नागपूर येथे तक्रार सुध्दा केली होती. परंतु हा तक्रारीची PF कार्यालय नागपूर चंद्रपूर यांनी कसलीही दखल घेतली नाही. म्हणून सर्व कामगार ACC कंपनी व युनियन यांना सुध्दा भेटुन ठेकेदार PF भरत नसल्याचे सांगितले असुन कामगारांचे युनियने सुध्दा समाधान केले नाही. 


कामगारांनी सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांच्याशी संपर्क साधला व आपल्यावर झालेल्या अत्याचार कंपनी व ठेकेदार हा करत आहे सर्व कहानी सांगितली पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभारण्यात आले होते. 


 न्यु पॅकिंग हाऊस येथील 190 कामगार 2011 पासुन तर मेंटेनेंस डिपार्टमेंट चे 13 कामगार 2016 पासुन असे 203 कामगारांनी मिळुन ACC कंपनीचा विरोधात आंदोलन केले होते.


5 जुन 2021 रोजी घुग्घुस आठवडी बाजारात चौदा दिवस आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची दखल घेत ACC कंपनीने एका महिन्यात तुमचा PF व अन्य मागण्या पूर्ण करु असे पोलीस स्टेशन घुग्घुस निरिक्षक साहेब राहुल गांगुर्डे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांचा समक्ष पुष्कर चौधरी यांनी लिखित स्वरूपात दिले होते. 


परंतु तब्बल दोन ते तीन महिने ओलांडून सुध्दा PF भरला गेला नाही म्हणून आणखी सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी ACC कंपनीला निवेदन देऊन सुचित केले कि कामगारांचा PF अद्याप भरलेला नाही लवकरात लवकर भरणा करावा असे वारंवार निवेदने देण्यात आले होते . 


कंपनीचे असे म्हणणे होते की आम्ही PF भरलेला आहे. परंतु PF कामगारांचा खात्यात जमा झालेला नव्हता.


सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी PF कार्यालय नागपूर येथे चौकशी केली असता PF निरिक्षक संतोष पौड यांनी सांगितले की फक्त एक करोड पाच लाख रुपयांचा डिडि जमा केलेला आहे. परंतु कुणाचा खात्यात टाकायचा आहे हे कंपनीने सांगितले नाही. असे PF निरिक्षक संतोष पौड यांनी सांगितले  होते. 


तर फक्त PF कार्यालय नागपूर येथे एक करोड पाच लाख रुपयांचा डिडि जमा केलेला होता आणि कामगारांना ACC कंपनी सांगत होती की तुमचा पुर्ण PF भरला गेला आहे.



परंतु ठेकेदार तिरुपती कंस्ट्रक्शन नितीन शर्मा हे कंपनीतुन काम सोडून गेला होता. त्यांचा ठिकाणी GR इंजिनिअरिंग हरेंद्रनाथ दत्ता याला न्यु पॅकिंग हाऊसचे काम देण्यात आले होते . 



असे करता आणखी 27 जानेवारी 2022 रोजी ACC कंपनीचा विरोधात काम बंद आंदोलन उभारण्यात आले होते . 


 काम बंद आंदोलन सुरू केले असता

ठेकेदार व त्यांचे सहयोगी कामगारांचा घरी जाऊन त्यांना धमकावत होते की जर तुम्ही कामावर आले नाही तर तुम्हाला कामावरून काढून टाकु असे अनेक धमक्या ठेकेदार व त्यांचे सहयोगी देत होते. 


28 जानेवारी 2022 रोजी ठेकेदार व ACC कंपनीने षडयंत्र रचुन आंदोलनामध्ये बाहेरील गुंड पाठवुन आंदोलन कर्त्यांना मारहान करून आंदोलनाचा ठिकाणी तोड फोड करण्यात आली होती. 



या आंदोलनाची दखल घेत ACC कंपनीने सप्टेंबर 2021 रोजी PF कार्यालय नागपूर येथे एक करोड पाच लाख रुपये फक्त अठरा महिन्याचा डिडि दिली होती. 


तो डिडि कामगारांचा खात्यात 27 जानेवारीचा आंदोलनाची दखल घेत 8 फेब्रुवारी 2022 रोजी कामगारांचा खात्यात जमा करणे चालू केले 


27 जानेवारी 2022 रोजी आंदोलन केले म्हणून 8 फेब्रुवारी 2022 रोजी कामगारांचा खात्यात PF जमा केला अन्यथा ACC कंपनी कामगारांचा PF जमा करत नव्हती. 


कामगारांचा पाल्यांना शिक्षणात 50% सुट देण्यात आली. कामगारांना मेडिकल इंशुरन्स पंधरा लाख रुपयांचे करण्यात आले. 

कामगारांना जर घरुन कामावर जात असतांना जर रस्त्यावर अपघात झाल्यास तीन लाख रुपयांचा इंशुरन्स मान्य करण्यात आले सर्व कामगारांना महिन्याला बावीस डिव्टीचा वरती काम देऊ वर्षाला PH 8 देऊ असे माण्य करण्यात आले होते.


कंपनीचा बदनामी झाली म्हणून चार दलित कामगारांना विनाकारण कामावरून काढून टाकले कारण हे चार कामगार आंदोलनाचा वेळेस समोर असल्याने या चार दलित कामगारांवरती हि ACC चांदा सीमेंट कंपनी गेल्या आठ महिन्यांपासून या चार कामगारांना कामावर घेत नाही आहे. लेबर कमिशनर चंद्रपूर व नागपूर येथे तक्रार करुन सुद्धा लेबर कमिशनर चंद्रपूर नागपूर यांचे सुध्दा कंपनीशी साठगाठ आहे असे दिसुन येत आहे.


म्हणून गेल्या आठ महिन्यांपासून या चार दलित कामगारांना कामावर घेत नसल्याने 8 ऑक्टोबर 2022 रोजी घुग्घुस येथे बस स्टॉप समोर ACC कंपनीचा विरोधात बेमुदत धरने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला तब्बल आज 45 दिवस ओलांडून गेले आहे. कामगारांचा रास्त मागण्या आहेत 


चार दलित कामगारांना लवकरात लवकर कामावर रुजू करण्यात यावे 


गेल्या आठ महिन्यांपासून तर आजपर्यंतचा पगार देण्यात यावा 


कामगारांना व त्यांच्या परिवाराला ACC कंपनी व ठेकेदार यांच्याकडून मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला त्याचे नुकसान भरपाई देण्यात यावी. 


कंपनीचे म्हणणे आहे की या चार कामगारांना कामावरती घेतले तर आणखी हे चार कामगार कंपनीमध्ये येऊन आंदोलन करतील.

परंतु जर कंपनी व ठेकेदार यांनी कामगारांना सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या तर कशाला हे कामगार आंदोलने करतील असे सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी सांगितले.

जर 17 डिसेंबर 2022 रोजी पर्यंत ACC कंपनीने या चार दलित कामगारांना कामावर घेऊन व त्यांना जेव्हापासून काडले तर आजपर्यंतचा पगार देण्यात यावा. व कामगारांवरती व त्यांच्या परिवाराला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला त्याचे नुकसान भरपाई देण्यात यावी.

अन्यथा आम्ही आम्हाला न्याय मिळवून घेण्यासाठी घुग्घुस ते नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात जाऊन आम्ही न्याय मागु जर तिथे सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही तिथून मुंबई मंत्रालय कार्यालयासमोर जाऊन बेमुदत धरने आंदोलन करुन या चार दलित कामगारांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सुरु ठेऊ व या आंदोलना मध्ये जे काही नुकसान व भरपाई चे जिम्मेदार हे ACC चांदा सीमेंट कंपनी व शासन प्रशासनाची याची जबाबदारी राहील.

जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तात्पुरते घुग्घुस येथील आंदोलन हे स्थगित करुन आम्ही मुंबई ला आंदोलन करणार असे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.