संविधान हाच आमचा सन्मान आहे डॉ. करुणा रामराजे -मालवीय.
संविधान हाच आमचा सन्मान आहे डॉ. करुणा रामराजे -मालवीय.
----------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रवि पी ढवळे
जिल्हा प्रतिनिधी
नवी मुंबई
---------------------------------------------------------------------
नवी मुंबई (बेलापूर ):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पी ई एस शिक्षण संस्थेच्या सीबीडी बेलापूर येथील शिक्षण संकुलात २६ नोव्हेंबर रोजी 'संविधान दिन' मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. बँड पथक व लेझीम पथका सह संविधानाची पालखीत दिंडी काढण्यात आली होती.
पीपल्स शिक्षण संस्थेच्या हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील सुमारे 1000 विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिक यात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नमुंमपा माध्यमिक शिक्षक तथा आंबेकरी चळवळीत कवी, लेखक, व्याख्याता व संविधान अभ्यासक आयु. मधुकर वारभुवन सर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नवी मुंबई आर पी आय जिल्हा अध्यक्ष आयु. महेश खरे होते. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता म्हणून,एम जी एम विधि महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या तथा जेष्ठ विधिज्ञ डॉ. करुणा रामराजे -मालवीय यांना आमंत्रित करण्यात आले होते. अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण करून उपस्थितांना संविधान, संविधानाचे महत्त्व व आपल्यावर अन्याय झाल्यास कोणत्या संवैधानिक मार्गाने विरोध केला पाहिजे हे विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून समजावून सांगितले.
दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य आयु. भास्करराव पवार सर यांनी सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले व अतिशय उत्तम कार्यक्रमाचे नियोजन केले. जेष्ठ शिक्षिका प्रतिभा भडिलकर मॅडम यांनी या कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.
Comments
Post a Comment