वळीवडेत रंगणार दुरंगी लढत.
वळीवडेत रंगणार दुरंगी लढत.
---------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------
: नेत्यांची आणि स्थानिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला
:गटातटाचे राजकारण शिगेला
:प्रचार यंत्रणेत गनिमी कावा!
गांधीनगर:- वळीवडे ता.करवीर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यावर्षी लोकनियुक्त सरपंच पदासाठी दुरंगी तर सदस्यांमध्ये तिरंगी लढत होत आहे. सरपंच पद सर्वसाधारण महिलासाठी राखीव असून स्थानिक युवा शेतकरी विकास आघाडी व राजर्षी शाहू संयुक्त आघाडी यांच्या विरोधात आ. सतेज पाटील गटाची राजश्री शाहू विजय आघाडीची काटे की टक्कर लढत होणार आहे.तर एका प्रभागात प्रभागात सदस्य पदासाठी शेतकरी बहुजन विकास आघाडीने तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
सरपंच पदासाठी युवा शेतकरी विकास व शाहू संयुक्त आघाडी तर्फे वळीवडेचे पहिले लोकनियुक्त सरपंच अनिल पंढरे यांच्या पत्नी संगीता पंढरे मैदानात उतरल्या आहेत. त्यांची आ. बंटी पाटील गटाच्या राजश्री शाहू विजय आघाडीच्या रूपाली रणजितसिंह कुसाळे यांच्याशी लढत होणार आहे.
गतवर्षी लोकनियुक्त सरपंच पदासाठी आ. बंटी पाटील गटाची राजश्री शाहू आघाडी तर्फे सुहास तामगावे, शेतकरी बहुजन विकास आघाडी तर्फे रावसाहेब दिगंबरे, व अपक्ष म्हणून अनिल पंढरे यांच्यात लढत होऊन पहिले लोकनियुक्त सरपंच म्हणून अनिल पंढरे यांनी बाजी मारली होती. बंटी पाटील गटाचे अकरा उमेदवार निवडून आले .तर युवा शेतकरी आघाडीचे सहा उमेदवार निवडून आले. त्यानंतर पंढरे यांनी महाडिक गटात प्रवेश केला. यंदा मात्र जय हिंद विकास सेवा संस्था, जय जिनेन्द्र विकास सेवा संस्था, आणि पंचगंगा पाणीपुरवठा संस्था यांनी संयुक्त स्थानिक पातळीवर युवा शेतकरी व राजश्री शाहू आघाडी स्थापन करून अनिल पंढरे, प्रकाश पासांना, व विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली पॅनल केले आहे. एकूण सहा प्रभागामध्ये आहेत. सरपंच पदासाठी 2 उमेदवार तर सदस्य पदाच्या 17 जागांसाठी तिन्ही आघाड्यांचे 37 उमेदवार आणि अपक्ष म्हणून तीन उमेदवार रिंगणात आहेत. एकंदरीत आ.बंटी पाटील गटाच्या राजश्री शाहू आघाडीने आमदार फंडातून केलेल्या विकास कामाच्या जोरावर ते आपले नशीब आजमावत आहेत. तर युवा शेतकरी व राजश्री शाहू आघाडी यांनी ग्रामपंचायती फंडातून व माजी आ. अमल महाडिक यांच्या कडून केलेल्या विकास कामाच्या माध्यमातून आपले नशीब आजमावतांना दिसत आहे. एकूणच 7283 मतदार वळीवडे गावची सत्ता कोणाकडे द्यायची हे ठरवणार हे मात्र नक्की.
1:- एकूण प्रभाग 6
सदस्य संख्या 17+1
एकूण मतदार 7283
सदस्य पदासाठी तिन्ही आघाड्या मिळून 37
अपक्ष संख्या 3
एकूण सरपंचपदासह 42 उमेदवार रिंगणात.
लोकनियुक्त सरपंच पद सर्वसाधारण महिला
सरपंच पदाचे संभाव्य उमेदवार:- संख्या दोन
१)युवा शेतकरी व राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवार म्हणून संगीता अनिल पंढरे
२)बंटी पाटील गटाच्या राजषी शाहू विजय आघाडीच्या रूपाली रणजितसिंह कुसाळे या आहेत.
चौकट 2) गावच्या विकासासाठी स्थानिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी गट तट न पाहता मिळून पॅनल तयार केले. तर त्याला कडवे आव्हान आ.सतेज पाटील यांच्या गटाचे असणार आहे. त्यामुळे वळीवडेच्या राजकारणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Comments
Post a Comment