भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचा संकल्पना चांगला प्रतिसाद.

 भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचा संकल्पना चांगला प्रतिसाद.

--------------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

मंगेश तिखट

--------------------------------------------------

उज्ज्वल ज्ञानेश्वर सोनटक्के यांनी मुलीचा वाढदिवस नकरता दिले दान 

घुग्घुस येथील भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव व विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे व कार्याध्यक्ष चंद्रगुप्त घागरगुंडे यांनी मिळून एक संकल्पना नेमली कि आपण पुष्कळ ठिकाणी व्यर्थ पैसा खर्च करतो जसे की कुणी मरण पावल्यास त्याचा तिसरा दिवस, एक वर्षाचा कार्यक्रम करणे, गृहप्रवेश करणे, मोठ्या ठाटात वाढदिवस साजरा करणे, अशा अनेक कार्यक्रमात आपण व्यर्थ पैसा खर्च करतो. 

म्हणून आपल्याकडे समाजकार्यात समाज कार्य करण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात पैसा गोळा होत नसल्याने आपण मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरा करु शकत नाही. 

यासाठी मग आपल्याला राजकारणी लोकांकडून पैसा घेऊन किंवा आर्थिक मदत घेऊन कार्यक्रम साजरा करावा लागतो हे आपल्या प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले नाही. 

म्हणून अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव व कोषाध्यक्ष हेमंतभाऊ आनंदराव पाझारे यांनी एक संकल्पना आखली कि आपण समाजातील समाज बांधवांना जागरूक करून नव्या दिशेने वाटचाल सुरू करु कि आपण व्यर्थ पैसा खर्च करू नये यासाठी प्रयत्न सुरू केले. 

त्यांना या संकल्पनाचे विचार लोकांपर्यंत पोहचवने सुरु केले त्यांना अरुण कांबळे यांनी आपल्या मामाचा तिसरा दिवस नकरता नवीन विहार बांधकामासाठी पाच हजार रुपये दान दिले तसेच विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत पाझारे यांनी सुद्धा आपल्या वडिलाचा वर्षाचा दिवस नकरता पंचवीस हजार रुपये दान दिले, शोभाबाई उमरे यांनी मुलाचा वर्षाचा दिवस नकरता पाच हजार रुपये दान दिले तर आज प. पु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून उज्ज्वल ज्ञानेश्वर सोनटक्के यांनी आपल्या चिमुकलीचा वाढदिवस साजरा नकरता पाच हजार रुपये  भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे चंद्रगुप्त घागरगुंडे आशिष परेकर यांच्या उपस्थितीत पाच हजार रुपये दान करुन या संकल्पनेचा वेग वाढवीला  असून अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी सांगितले की हळूहळू जनतेमध्ये हि संकल्पना नक्की काम करेन व एक दिवस असा येईल कि जनता व्यर्थ पैसा खर्च करणार नाही.

यावेळेस भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव कार्याध्यक्ष चंद्रगुप्त घागरगुंडे विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंतभाऊ आनंदराव पाझारे, कोषाध्यक्ष आशिष रमेश परेकर शरद मल्हारी पाईकराव उज्ज्वल सोनटक्के उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.