रंजना पोळकर हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी बिहारमधून जेरबंद.
रंजना पोळकर हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी बिहारमधून जेरबंद.
-------------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
ज्ञानेश्वर घुग
-------------------------------------------------------------------------
वाशिम..शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडी प्रमुख बहुचर्चित रंजना पौळकर यांचेवर १० नोव्हेंबर रोजी वाशिम येथे धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाला . या प्रकरणाच्या तपासा दरम्यान वाशिम येथील संशयित आरोपी म्हणून अब्दुल वाजीद , अब्दुल सईद , अब्दुल जुबैर अब्दुल जब्बार ,शेख नूर शेख रशीद ,नितीन कावरखे , भगवान वाकुडकर व शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांचे धागेदोरे हाती लागले असता त्यांना तात्काळ अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती श्री . सुनील कुमार पुजारी (पोलीस उपविभागीय अधिकारी) यांनी दिली.
परंतु या घटनेतील प्रत्यक्ष मुख्य आरोपी अटलकुमार यादव हा फरार होता .त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल मोहनकर , सुनील पवार (जमदार) , राजेश राठोड (पोलीस नाईक) ,प्रशांत राजगुरू (पोलीस नाईक) , डिगांबर मोरे (पोलीस शिपाई) ,अविनाश वाढे (पोलीस शिपाई) यांनी मुख्य आरोपी चा शोध घेत अखेर बिहार मधील ग्राम दावत जिल्हा. रोहतास गाठून आरोपीला मुसक्या आवळल्या त्यादरम्यान आरोपी जवळ दोन देशी कट्टे आढळून आले. आरोपी ची कसून चौकशी केली असता रंजना पौळकर यांना जिवे मारण्यासाठी 20 लाखांची सुपारी देण्यात आली होती असे आरोपी अटलकुमार याने सांगितले. पोलीस पथकाने मुख्य आरोपी ला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
Comments
Post a Comment