बनावट अपघात प्रकरणातील सम्बधितांची चूळबुळ सुरु!!
बनावट अपघात प्रकरणातील सम्बधितांची चूळबुळ सुरु!!
------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
आमच्या न्यूज चैनल वर एका बोगस अपघात प्रकरणाबद्दल बातमी प्रसिद्ध होताच, सर्वत्र मोठी खळबळ उडाली या प्रकरणात सामील लोक आणि त्यांचे सहकारी या बातमीने चांगलेच हादरले. सुरुवातीला आमच्याकडे वाईट हेतू पुरस्कार संपर्क साधून बोलण्याचा बहाना केला, मात्र वर्षानुवर्षे बनवेगिरी करण्यात माहीर असणाऱ्या या लोकांनी कोल्हापूर बार असोसिएशन मधील वरिष्ठांच्याकडे तक्रारीचा सुरच वडलाय, मात्र सदरचे प्रकरण सी.आय.डीच्या तपासात असताना आपल्यापर्यंत सी.आय.डी. पोहचू नये हा दुष्ट हेतू कोणाकडूनही लपून राहिले नाही. एखाद्या प्रकरणात आपण नक्की अडकणार हे सर्वांना समजून चुकले आहे त्यामुळेच यातील सामील लोकांनी एकत्र येऊन आणखीन एक कुटील डाव प्रसार माध्यमांच्या वरती आखण्यास सुरुवात केली आहे. आमच्या बातमीतील उल्लेख असल्यानेच तो खोडून काढण्यासाठी व आपली बाजू मांडण्यासाठी त्यांना कोणी अडवलेले नाही. मात्र चलाखी करणे, पुरावे बदलणे, खोट्या घटनाक्रम तयार करणे अशा मध्येच या लोकांची हयात गेल्याने त्यांच्याकडून फारश्या सत्यतेच्या अपेक्षा करणे साफ चुकीचे ठरेल. कोल्हापूर बार असोसिएशन मधील जेष्ठ वकिलांनी नाव न छापण्याच्या अटीवर या आणि अशा विविध प्रकरणात कशाप्रकारे बनवेगिरी चालते हे आमच्याकडे बोलून दाखवले आहे. मुळात प्रसार माध्यमांचा हेतू हा एखादी बातमी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी हाच असतो. या प्रकरणात तपास यंत्रणा कोणत्याही दबावाला बळी न पडता काम करेल अशी आशा आहे. कारण मुळात हा गुन्हा हा कागदोपत्री आहे. त्यामुळे यात ज्या लोकांच्यावर गुन्हा शाबित होईल त्यांना तर शिक्षा नक्कीच आहे. मात्र वकिली पेशाला न शोभणारी अशी वृत्ती आणि त्यांच्या कारणाम यांना विरोध करणे आणि ती जगासमोर मांडणी हे प्रसारमाध्यमान बरोबरच सर्वांचेच उद्दिष्ट असले पाहिजे.
Comments
Post a Comment