कोल्हापूर जिल्हा न्यायालयात एका 'थप्पड की गुंज'.

 कोल्हापूर जिल्हा न्यायालयात एका 'थप्पड की गुंज'. 


---------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

कोल्हापूर प्रतिनिधी

अन्सार मुल्ला

--------------------------------------

कोल्हापूर (प्रतिनिधी):- दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा न्यायालयात एका 'थप्पड की गुंज'  ची चर्चा सर्वात्र गाजत आहे. पन्हाळाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावातून वकिलीसाठी शहरातील महाराणा प्रताप चौक मध्ये आलेल्या आणि गेल्या तीस वर्षाहून अधीक काळ दिवाणी वकिलीमध्ये  चांगलेच नाव कमावलेल्या जेष्ट वकिलाला एका दुसऱ्या वकिलाने भर कोर्टात जोरदार कानशिलात लगावली.

 सहा फूट उंच आणि धिप्पाड आशा वकिलाने उंचीने कमी पण अनुभवाने जेष्ट आशा वकिलाला एका थप्पड लगावली  त्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. जिल्ह्यातील मोठ्या देवस्थान ट्रस्ट वर असलेल्या आणि प्रतिष्ठित डॉक्टर आणि उद्योगपतींचे जवळचे विश्वासू असलेल्या या जेष्ट वकिलाला या थप्पडच्या अपमानाने काय करावे ते समजत न्हवते. काही वकिलांनी मध्यस्थी केली असली तरी या प्रकारची चर्चा सर्वत्र सुरू आहे. कायद्याच्या मंदिरातच दोन वकिलांच्या मधील वाद इतका विकोपाला गेल्यावर एका वकिलाने एका थपडीत दुसऱ्या वकिलाला दिवसा चांदण्या दाखवल्याने शहरात याची खुमासदार चर्चा सुरु आहे.:- दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा न्यायालयात एका 'थप्पड की गुंज'  ची चर्चा सर्वात्र गाजत आहे. 

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.