प्रांत ग्राहक संरक्षण समिती दिल्ली या समिती कडून जुलेखा मुलाणी दीदी यांची कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड.
प्रांत ग्राहक संरक्षण समिती दिल्ली या समिती कडून जुलेखा मुलाणी दीदी यांची कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड.
-------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
जयसिंगपूरः प्रतिनिधी
-------------------------------------------------------------------
ग्राहक संरक्षण प्रांत ग्राहक संरक्षण परिषद समितीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. यावेळी प्रांतग्राहक संरक्षण परिषदेची जुलेखा मुलाणी दीदी यांची कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली संतोष सरदेसाई गोवा प्रदेशाध्यक्ष व विपुल शेंडगे लातूर अध्यक्ष व फैजल डांगे जगन्नाथ कांबळे सुरज शहा मानशी पवार हे उपस्थित होते.
राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले म्हणाले,की जागो ग्राहक जागो या हेतूने सामाजिक बांधिलकी राखून प्रांत ग्राहक संरक्षण परिषद समितीच्या माध्यमातून अनेक ग्राहकांचे प्रश्न सोडवण्याचे काम आम्ही गेले अनेक वर्षे करत आहोत. रोहा तालुक्यात अनेक प्रश्न आहेत आणि ग्राहकांची फसवणूक होत असते प्रत्येक ठिकाणी ग्राहकांना फसवणारे अनेक व्यापारी उद्योजक कोणत्या ना कोणत्या माध्यमातून फसवत असतात त्यासाठी आपल्याला जनजागृती करण्याची गरज आहे.जनजागृतीच्या माध्यमातून आपण आपली संस्था जनसामान्य पर्यंत जास्तीत जास्त गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करा असे आव्हान भोसले यांनी छोट्या कार्यक्रमात केली.
Comments
Post a Comment