महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर सलग २० दिवसात दुसऱ्यांदा नियतीचा घाला.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर सलग २० दिवसात दुसऱ्यांदा नियतीचा घाला.
--------------------------------------------------------------------------वाशिम जिल्हा प्रतिनिधी
वाशिम. महावितरणच्या मालेगाव उपविभाग अंतर्गत येत असलेल्या 33/11 के. व्ही. उपकेंद्र किन्हीराजा येथून तीन वीज वाहिन्या निघतात त्यावरील कवरदरी या वीज वाहिनीवर मागील पंधरा दिवसांमध्ये श्री गोपाल विष्णू हरणे वय 25 वर्ष (बाह्य स्त्रोत तंत्रज्ञ) हे कनिष्ठ अभियंता यांचे सोबत काम करत असताना त्यांना जोरदार विजेचा झटका लागला असता त्यांच्या दोन्ही हाताला गंभीर झाली तरी अजून त्यांच्यावर वाशिम येथील रुग्णालयात उपचार चालू आहे.
तसेच आज १४ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा ते साडे अकराच्या दरम्यान किन्हीराजा उपकेंद्र येथे मागील चार ते पाच वर्षापासून कार्यरत असलेले यंत्रचालक श्री शरद उत्तम रामटेके वय 38 वर्ष यंत्रचालक हे उपकेंद्राच्या यार्ड मध्ये ११,००० होल्ट कवरदरी वीज वाहिनीवर भारनियमन करून विज वाहिनीचा संपर्क तोडण्याकरिता गेले असता त्यांना विजेचा जबरदस्त शॉक बसला व ते जागेवरती कोसळले. दहा मिनिटानंतर किन्हीराजा उपकेंद्र येथील बाहेर स्त्रोत यंत्राचालक श्री सुनील जाधव हे उपकेंद्रामध्ये आले असता त्यांनी श्री शरद रामटेके यांना गंभीर अवस्थेमध्ये बघितल्यानंतर ताबडतोब प्रथमोपचार करून कनिष्ठ अभियंता श्री अमोल एस नवरे यांना घटनेची माहिती दिली व पुढील उपचारासाठी रामटेके यांना शासकीय रुग्णालय वाशिम येथे आणण्यात आले.
Comments
Post a Comment