महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन संपन्न.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन संपन्न.
-------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------
दि. 06 डिसेंबर 2022 रोजी 66 व्या महापरिनिर्वाण
दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महादेवराव बी. एड. कॉलेज, तुर्केवाडी यांचेकडून विनम्र अभिवादन करणेत आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य एन.जे.कांबळे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विभागप्रमुख प्रा. श्री. प्रधान ग.गो हे होते.
कार्यक्रमाची सुरवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. 'आजच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानपीपासूपणा व वाचनाचा व्यासंग हे गुण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कडून घेतले
तर ते सक्षम व परखड बनतील' असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक प्रा. प्रधान ग. गो. यांनी केले. अध्यक्ष प्र. प्राचार्य एन.जे.कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा आढावासांगून त्यांच्या विचारांबाबत वैचारिक जागृती होणे गरजेचे असलेचे मत मांडले .
महापरीनिर्वाण दिनानिमित्त राबविलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये
प्रशिक्षणार्थीनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यामध्ये सविता चौगुले,तुकाराम नाईक, प्रियांका पाटील, उज्वला कांबळे , काजल
गावडे,कमल नाईक यांनी सहभाग नोंदवून स्वतःची मते व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष महादेवराव वांद्रे, फार्मसी प्राचार्य अमर पाटील, पॉलिटेक्निकचे प्राचार्य एस. पी. गावडे, कार्यालयीन अधिक्षिका श्रीम-स्वप्ना देशपांडे, प्रा. सचिन कांबळे, प्रा. गुरव व्ही. पी. , प्रा. पृथ्वी कांबळे, श्री. प्रशांत काजीर्णेकर, बी. एड्. प्रशिक्षणार्थी सहभागी होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन
प्रशिक्षणार्थी तुकाराम नाईक यांनी केले. प्रास्ताविक युवराज वाघमोडे यांनी केले तर आभार प्रियांका पाटील यांनी मानले.
Comments
Post a Comment