भाजप कोरपना तालुक्याच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून माल्याअर्पन करण्यात आले.
भाजप कोरपना तालुक्याच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून माल्याअर्पन करण्यात आले.
--------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट
-------------------------------------------------
भाजप कोरपना तालुक्याच्या वतीने परमपूज्य,विश्वभुषण, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून, माल्याअर्पन करून,अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष होते तर प्रमुख उपस्थिती प्रविण भोयर सुरेन्द्र पावडे,सुरेश दळांजे,अमोल मडावी,सुधाकर,कव्वलवार,श्रावण पेंदोर,दिवाकर गेडाम आदी उपस्थित होते तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात श्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला 6 डिसेंबर 1956 देवाज्ञा झाली ते भारतीय न्यायशास्त्र,अर्थशास्त्र,राजकारणी तत्त्वज्ञान आणि समाज सुधारक होते त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य,दलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली होती तसेच महिला व कामगारांच्या हक्काचे समर्थन केले ते राज्यघटनेचे शिल्पकार होते त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले असे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन दिवाकर गेडाम यांनी केले तर आभार सुधाकर कव्वलवार यांनी मानले.
Comments
Post a Comment