खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाची तयारी अंतिम टप्‍प्‍यात.

 खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाची तयारी अंतिम टप्‍प्‍यात.

--------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

नागपूर, प्रतिनीधी

-------------------------------------------

मिस कॉल द्या आणि पासेस मिळवा

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाची तयारी अंतिम टप्‍प्‍यात असून ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्‍या पटांगणावर स्‍थानिक कलाकारांच्‍या ‘वंदे मातरम’ या बहुरंगी कार्यक्रमाचा सराव जोरदार सुरू आहे. संस्‍कृत सखी सभा, नागपूरच्‍यावतीने संपूर्ण गीता पठण महायज्ञालाही महिलांचा उत्‍स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्‍या  भारतातील सर्वात मोठ्या खासदार सांस्‍क‍ृतिक महोत्‍सवाचे यंदाचे सहावे वर्ष आहे. महोत्‍सवाचे उद्घाटन शुक्रवार, 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार असून प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांची प्रत्‍यक्ष तर ईशा फाउंडेशनचे संस्‍थापक सद्गुरू जग्‍गी वासुदेव यांची आभासी उपस्थिती लाभणार आहे. स्‍वातंत्र्यांच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षान‍िम‍ित्‍त स्‍थानिक कलाकारांच्‍या ‘वंदेमातरम्’ हा बहुरंगी कार्यक्रमाने महोत्‍सवाचे उद्घाटन होईल. यात स्‍थानिक 1200 कलाकारांचा समावेश असून नृत्‍य, नाट्य, गायन, वादन आदींचा संगम यात बघायला मिळणार आहे. त्‍याकरिता 25 हजार चौ.फूट आकाराचा 11 फूट उंचीचा 4 स्‍तरीय मंच उभारला गेला असून त्‍यावर बुधवारी सर्व कलाकारांचा सराव घेण्‍यात आला. 

याशिवाय, रविवार, 4 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 वाजेदरम्‍यान होणा-या या गीता पठन महायज्ञासाठी स्‍वतंत्र मंच आणि 5500 हजार महिलांच्‍या बसण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीनाथपीठ, श्री देवनाथ मठ, श्रीक्षेत्र अंजनगाव सुर्जीच्‍या प. पू. रेणुका मायबाई यांच्‍या हस्‍ते होणार असून राष्‍ट्रसेविका समितीच्‍या प्रमुख संचालिका वंदनीय शांताक्‍का यांची आभासी उपस्‍थ‍िती राहणार आहे. महायज्ञाच्‍या स्‍वागताध्‍यक्ष मा. कांचनताई गडकरी आहेत. 

मिस कॉल द्या पासेस मिळवा

नागपूरकरांना या सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा आस्‍वाद घेता यावा, या उद्देशाने मागील वर्षी प्रमाणे यंदाही ऑनलाईन माध्‍यमातून घरबसल्‍या पासेस मिळवता येणार आहेत. त्‍याकरीता नागरिकांनी 9158880522 या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल द्यायचा असून एक डिजिटल लिंक तयार होईल. ही लिंक क्‍लीक केल्‍यानंतर कार्यक्रमाची पास घरबसल्‍या आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करता येईल.


संपूर्ण देशाची  भारताची शान असलेल्‍या या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला नागपूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्‍यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्‍य बाळ कुळकर्णी, सारंग गडकरी, हाजी अब्‍दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, अॅड. नितीन तेलगोटे, विलास त्रिवेदी, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील,  मनीषा काशिकर यांनी केले आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव वेळापत्रक


2 डिसेंबर -  सुविख्‍यात अभिनेते नाना पाटेकर व सदगुरू जग्‍गी वासुदेव यांच्‍या उपस्‍थ‍ितीत उद्घाटन व स्‍थानिक कलाकारांच्‍या ‘वंदेमातरम’ या कार्यक्रमाने.

3 डिसेंबर– सेवावस्‍ती निवासी मुलांचे लघुनाट्य ‘तारे जमीं पर’ व सुप्रसिद्ध गझल गायक पद्मश्री हरिहरन यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’.

4 डिसेंबर 2022 – सकाळी 9.30 वाजता गीतापठन महायज्ञ तसेच, सायंकाळी 6.30 वाजता श्‍याम देशपांडे यांचा ‘जागर राष्‍ट्रभक्‍तीचा’ हा कार्यक्रम व अम‍ित त्रिवेदी यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’ 

5 डिसेंबर 2022 – ट्रान्‍सजेंडर कलावंतांची नृत्‍य प्रस्‍तुती व अभिनेते मनोज जोशी यांचे ‘चाणक्‍य’ हा नाट्य प्रयोग

6 डिसेंबर 2022 – सुरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुंजीचे व्‍हायोलिन वादन व ‘तथागत’ हे महानाट्य.

7 डिसेंबर 2022 -  श्री. श्‍याम देशपांडे यांचा ‘जागर राष्‍ट्रभक्‍तीचा’ हा कार्यक्रम व ‘पुण्‍यश्‍लोक अहिल्‍या’ हे महानाट्य

8 डिसेंबर 2022 – छत्‍तीसगढी पंथी नृत्‍य व मनोज मुंतशिर यांचा ‘माँ, माटी और मोहब्‍बत’ हा कार्यक्रम 

9 डिसेंबर 2022 – बालकला अकादमी प्रस्‍तुत ‘तारे जमीं पर’ व प्रसिद्ध अभिनेते व कवी शैलेश लोढा व इतर कवींचे कविसंमेलन

10 डिसेंबर 2022 – सायली उजवणे व निलाक्षी खंडकर यांची शास्‍त्रीय व उपशास्‍त्रीय नृत्‍य प्रस्‍तुती व सुप्रसिद्ध गायिका कविता कृष्‍णमूर्ती यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’ 

11 डिसेंबर 2022 – शिवमुद्रा ढोलताशा पथकाचा ‘शिवशाहीची रणधुमाळी हा कार्यक्रम व गायक मोहित चौहाण यांच्‍या लाईव्‍ह कॉन्‍सर्ट.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.