वाॅरियर ड्रिम सिरीज तर्फे किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन.

 वाॅरियर ड्रिम सिरीज तर्फे किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन.


-------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुंबई प्रतिनिधी

महेश कदम 

-------------------------------------------

जवाहरलाल नेहरू पोर्ट टाऊनशीप (जे एन पी टी) येथे वाॅरियर ड्रिम सिरीज यांनी आयोजित केलेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत इनक्रेडिबल मार्शल आर्ट अकॅडेमी च्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, त्या मध्ये ईतर जिल्हाहुनही खेळाडूंनी भाग घेतला होता. ह्या खेळातून खेळाडूंचा मानसिक व शारीरिक भागांचा पुर्णपणे विकास होतो. हे ह्या किक बॉक्सिंग च्या खेळाडूंनी आपल्या खेळातून प्रात्यक्षिक रित्या दाखवले. हा खेळ जेवढा बघण्यासाठी थरारक वाटतो तेवढाच खेळाडूंचा आत्मविश्वास सुद्धा वाढवतो कारण ह्या खेळात मानसिक व शारीरिक गोष्टींचा योग्य वापर करून स्वताला त्यात समावेश करतो. स्वरक्षण करण्याचा आत्मविश्वास अशा प्रकारच्या खेळातून येऊ शकतो हे ह्या खेळाडूंनी दाखवले आहेत. त्या मध्ये त्यांना संघ प्रशिक्षक संदीप शिवतरकर, सुनील झगडे व प्रितेश शिगवण यांनी मार्गदर्शन केले. सुवर्णपदक विजेते खेळाडू मध्ये गणेश गुरव, श्री देसाई,  मयुरेश खवळे होते तर रौप्य पदक खेळाडू मध्ये प्रसाद आरोलकर, सुशांत कोतावडेकर, यश खोपकर,  जिगनेश खोपकर, तनया हळणकर,  ईश्वरी घामणकर, जितेश कांबळे हे विजयी ठरले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.