जमीयतुल मन्सुर महाराष्ट्र राज्याची पुणे येथे मन्सुरी, पिंजारी,नद्दाफ समाजाचा मेळावा संपन्न.
---------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट
--------------------------------------
जमीयतुल मन्सुर महाराष्ट्र राज्याचे पुणे शहरात मोठ्या संख्येने मेळावा आयोजित करण्यात आला होता अधिवेशन मोठ्या उत्साह संपन्न झाले. यामध्ये मंसूरी, पिंजारी समाजाचे संघटना पश्चिम महाराष्ट्रातील मंसूरी पिंजारी पुणे शहरात येथे हा उपक्रम राबविण्यात आला पुणे येथे इमामे अजूम अब्बु हनीफा हॉल साईबाबा नगर अक्षरधाम सोसायटी शेजारी कोंढवा पुणे येथे मंसूरी, पिंजारी समाजाचा एक दिवशी अधिवेशनात पिंजारी समाजाचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पिंजारी समाजाचा गावागावात जाऊन गादी बनविणे हा व्यवसाय होता.आज पिंजारी समाजातील काही लोकांन कडे पुरावे नसल्याने जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र बनविता येत नसल्याने हा समाज अजुनही वंचित आहेत.हा समाज इतर मागासवर्गीय प्रवर्गात मोडत असल्याने.यांना जातीचे प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे.तसेच समाजाच्या विशेष समस्यावर चर्चा करण्यात आली असे मुद्द्यावर चर्चा करण्यात आली या दरम्यान महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आरिफ अली मंसूरी यांनी अध्यक्षस्थानी आपली भूमिका स्पष्ट मांडली यावेळी हाजी मिरा नद्दाफ, अब्दुल सत्तार, नगरसेवक हाजी फिरोज शेख, नगरसेवक हाजी गफुर पठाण, नगरसेवक
रईस सुडके,हसीफ नद्दाफ, अब्दुल रहमान पिंजारी,हाजी रोशन मन्सुरी,नीम मन्सुरी,सलीम नद्दाफ,बशीर मासुम,आरीफ रहमान,तौसीफ रहमान,पुणे जिल्हा अध्यक्ष अनिस पिंजारी महाराष्ट्र राज्याचे अनेक जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष पदाधिकारी मंसूरी पिंजारी नदाफ समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच पिंजारी समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील पत्रकार म्हणून हबीब शेख चंद्रपूर, फिरोज मन्सुरी लासुर,तर वकील अँड जफर पिंजारी, रेल्वे अधिकारी अशपाक शेख, तसेच समाजीक क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तीचा यावेळी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment