दे.भ. रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयास आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ डॉ. परशराम पाटील यांची भेट..
दे.भ. रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयास आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ डॉ. परशराम पाटील यांची भेट..
-------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------
कोल्हापूर: दे.भ.रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयास आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कृषी अर्थतज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी भेट दिली. यावेळी झालेल्या चर्चासत्रात विद्यार्थ्यांना त्यानी 'भारतीय कृषी निर्यात धोरण' या चर्चासत्रात मार्गदर्शन केले.
यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात विशेषता पश्चिम घाटामध्ये काजू, मध, ऊस, फुल आणि पर्ण शेतीला खूप महत्त्व आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या जमिनीतला कस आणि पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास आपल्याकडे असणाऱ्या कच्च्या मालाला सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उपलब्ध आहे. कृषी उद्योग आणि पर्यावरण यामधील संबंध स्पष्ट करत भारत सरकारच्या वेगवेगळ्या कृषी निर्यात धोरण आणि योजनांची माहिती उपस्थितांना दिली. तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता अशा पद्धतीचे पर्याय शोधून ते भारत सरकारच्या स्टार्टअप योजनेतून सुरू करावेत असेही त्यांनी आवाहन केले. भारताची जगात वेगळी ओळख होत आहे. आणि कृषी क्षेत्रामध्ये नेतृत्व करण्याची संधी आणि क्षमता भारतीयांच्यात आहे असे नमूद करत त्यासाठी व्यूहरचना आणि योग्य नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे लागेल तरच आपला देश हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामधे महाराष्ट्राची भूमीका यासंदर्भात अत्यंत महत्वाची असेल असेही ते म्हणाले विद्यार्थ्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये व कृषी निर्यात क्षेत्रामध्ये असणाऱ्या संधींचा उपयोग करून आपले स्वतःचे व देशाचे नाव उज्वल करावे असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी कॉमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करत तरुणांनी शेती क्षेत्राचा आणि निर्यात धोरणाचा विद्यार्थी आणि अभ्यासक्रम शी असणारा संबंध स्पष्ट करून शेतीवर आधारित शेतमालावर प्रक्रिया किंवा निर्यात धोरणाशी माहिती आत्मसात करावीआणि व्यवसाय सुरू करावेत, असे आवाहन केले.
सदर चर्चा सत्रास कौन्सिल ऑफ एज्युकेशन चे अध्यक्षा सौ रजनीताई मगदूम आणि सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी विधी विभाग प्रमुख प्रा.अतुल जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि ओळख केली तर उपप्राचार्य प्रा. बी. टी. नाईक यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment