स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे घवघवीत यश
स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे घवघवीत यश.
-----------------------------------------------------------------------------------चंदगड प्रतिनिधी
कार्वे ( ता.चंदगड) येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचा विद्यार्थी डॉ. आसिफ अस्लम बागवान (M.B.B.S.) याला M.S.(General surgery) साठी धुळे येथील गव्हर्नमेंट वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे . M.S. साठी प्रवेश मिळणे म्हणजे 'ग्रेट अचिव्हमेंट' म्हणावी लागेल.कठोर मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी घालणे हे अशक्य नाही .हे डॉ आसिफ याने दाखवून दिले असे गौरवोद्वागार प्रा.श्री.एन. के.जावीर यांनी काढले.त्यांच्या हस्ते डॉ.आसिफ यांचा यथोचित सत्कार व विद्यार्थ्यांना उद्धबोधन करण्यात आला.त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा C.A. शाम ओऊळकर व माजी विधार्थी यांनी केले.डॉ.आसिफ बागवान यांनी या अभ्यसिकेला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संदर्भग्रंथ ,इतर पुस्तके ,साहित्य भेट म्हणून दिली.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक या अभ्यसिकेचे संचालक मनोज जांबोटकर ,सुत्रसंचालन सौरभ पाटील व आभार रेणुका गावडे यांनी केले.
Comments
Post a Comment