शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल पंधरा हजार रु. भाव द्या-सुदाम राठोड यांची मागणी.

 शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल पंधरा हजार रु. भाव द्या-सुदाम राठोड यांची मागणी.

---------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

मंगेश तिखट

--------------------------------------

सुदामभाऊ राठोड यांच्या हस्ते तहसीलदार जिवती यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल 15000 (अक्षरी पंधरा हजार रुपये)  भाव द्या. महागाईच्या काळामध्ये शेतकऱ्यांना बिजाई,खते आणि औषधे अत्यंत महाग दरामध्ये घ्यावे लागते.वरून वेळेवर निसर्ग साथ देत नाही, आणि सरकार सुद्धा शेतकऱ्यांची मदत करत नाही. कारण शेतकऱ्यांच्या मालाला व्यापारी किंमत ठरवतात. आणि शेतकऱ्यांचे सर्व माल व्यापारी आपल्या मर्जीने खरेदी करून शेतकऱ्यांचा माल साठा करतात.जेव्हा शेतकऱ्याजवळचा माल संपतो तेव्हा सरकार मालाला भाव वाढवतात ही वस्तुस्थिती आहे. सरकार फक्त व्यापाऱ्यांचा फायदा करतात. मग हा शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे की व्यापाऱ्यांच्या हा शेतकऱ्यांना भेडसावणारा प्रश्न आहे. तरी मुख्यमंत्री साहेबांनी जातीने लक्ष घालून या देशाच्या पोशिंद्याला न्याय मिळवून द्याल अशी विनंती जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी निवेदन देऊन केली आहे.यावेळी चंद्रपूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख विशाल राठोड,प्रल्हाद काळे, प्रदीप काळे,किशोर कांबळे, रामदास कांबळे गणपती येमे,भीमराव कांबळे,रविकांत कांबळे, विजय कांबळे,विनोद काळे,ततेराव कांबळे व शेतकरी बांधव उपस्थित होते.आमच्या मागण्या मान्य न झाल्यास समस्त शेतकरी बांधव व विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि जय विदर्भ पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुदामभाऊ राठोड यांनी दिला आहे. या आंदोलनात काही हिंसक वळण लागल्यास सर्वस्व सरकार जबाबदार राहील.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.