प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य युवाध्यक्ष नितीन शिंदे वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२२ ने सन्मानित
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य युवाध्यक्ष नितीन शिंदे वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२२ ने सन्मानित
----------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------
महाराष्ट्र संपादक संघाचे अध्यक्ष प्रकाश कुलथे, डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ दत्ता विघावे प्रा. नागेश हुलावणे, प्रा अरुण सावंग, प्रा प्राची ब्राह्मणे प्रा अँड तेजल, पत्रकार श्री लुनेश्वर भालेराव आदी विविध क्षेत्रातील नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात करण्यात आले.श्री नितीन शिंदे यांच्या मानव सेविची विविध क्षेत्रातील संघटना,संस्थांनी व महान समाजसेवक व्यक्तींनी दखल घेऊन त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने व गौरव पत्राने सन्मानित केले आहे. ते माळेवाडी महुडे खुर्द या गावचे सुपुत्र असून सामाजिक कार्यकर्ते संदिप शिंदे यांचे लहान बंधू आहेत.श्री नितीन शिंदे यांच्या सामाजिक सेवेची दखल जागतिक स्तरावर काम करणाऱ्या संघटनेने घेतली म्हणून त्यांचे सर्व स्त रावर कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
यावेळी बोलताना श्री नितीन शिंदे यांनी हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून आपले आई वडील सर्व मित्र परिवार पत्रकार बंधू तसेच मोठे बंधू श्री संदिप शिंदे तसेच संपूर्ण शिंदे परिवार याच बरोबर पत्रकार क्षेत्रातील गुरु, मार्गदर्शक श्री डी. टी. आंबेगावे सरांचा आहे.मला मार्गदर्शन केलेल्या ज्ञात अज्ञात अशा सगळयांचा मी आभारी आहे असे श्री नितीन शिंदे यांनी यावेळी सांगितले
Comments
Post a Comment