राष्ट्रवादीच्या मागणीला यश , खासदाराच्या प्रयत्नातुन वंचित शेतकऱ्याना मिळणार .
राष्ट्रवादीच्या मागणीला यश , खासदाराच्या प्रयत्नातुन वंचित शेतकऱ्याना मिळणार.
----------------------------------------------------------------------चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
अतिवुष्टीचा लाभ,चंद्रपूर जिल्ह्यात जुलै ऑगस्ट दरम्यान जोरदार अतिवृष्टी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले होते 113 गाव असलेल्या कोरपणा तालुक्यातील प्रथम पंचनामांमध्ये अनेक गावातील नुकसानग्रस्त शेतकरी वंचित होते याबाबतच्या अनेक गावातील नागरिकांनी तक्रारी होत्या काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा अतिवृष्टीच्या लाभापासून वंचित राहिले तर काही ठिकाणी ग्रामसेवक तलाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यामार्फत पंचनामे करण्यात आले होते मात्र पंचनामे करताना ज्या लोकांचं नुकसान झालं नाही अशा लोकांना मोठा लाभ झाला तर ज्यांचे ज्यांचे प्रत्यक्षात मोठे नुकसान झाले.
अशांना अल्प अनुदान मिळाले होते तर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पुन्हा पावसाने थैमान घातल्याने अनेक शेतकऱ्यांना शेतातील कापूस सोयाबीन पिकाला फटका बसून नुकसान सहन करावे लागले ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे सय्यद आबिद अली यांनी ऑक्टोबर मध्ये खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्याकडे निवेदन देऊन कोरपणा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली होती तसेच काँग्रेस कमिटीचे आशिष देरकर राजुरकर यांनी खासदाराकडे आग्रह करून मागणी केली व जिल्हाधिकारी यांच्याकडे ही बाब निदर्शनास आणतात खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ व्हावा म्हणून पाठपुरावा करीत फेर सर्वेक्षण करण्यात यावे असे निर्देश दिले होते यावरून कोरपणा तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील बारा कोटी दहा लक्ष रुपये निधी यापूर्वी वितरण करण्यात आलेला आहे तसेच फेर सर्वेक्षणामध्ये 71 गावातील 8731.32 हेक्टर हेक्टर पीक नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केला असून 11 कोटी 86 लाख 9992 रुपये वाढीव निधी शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे याबाबत खासदारांनी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सातत्याने शासनाकडे प्रयत्न करून हा निधी उपलब्ध होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment