लाचखोर पोलिस पाटलावर अँटी करप्शन ची कार्यवाही.
लाचखोर पोलिस पाटलावर अँटी करप्शन ची कार्यवाही.
--------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
जिल्हा प्रतिनिधी वाशिम
ज्ञानेश्वर घुगे
--------------------------------------------------
वाशिम.. रिसोड तालुक्यातील ग्राम खडकी येथील इसमाच्या मुलावर रिसोड पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल होऊन तो साध्या तुरुंगात असल्यामुळे तक्रारदार मुलाच्या सुटकेसाठी वणवण भटकत असल्याचा फायदा घेऊन आरोपी प्रकाश कळणू धांडे वय ५७ हे ग्राम खडकी तालुका रिसोड येथील पोलिस पाटील असून त्यांनी तक्रारदार यांच्या मुलाला तुरुंगातून सोडवण्याची अमिश दाखवून २०,००० हजार रुपयांची मागणी केली असता तडजोडीअंती रोख रक्कम १०,००० रुपये दिले याची माहिती तक्रारदाराने अँटी करप्शन विभागाला कळविल्यानंतर तातडीने पाऊल उचलून कार्यवाहीस सुरुवात करून श्री . मारोती जगताप (पोलिस अधीक्षक) , श्री. अरुण सावंत (अप्पर पोलिस अधीक्षक) ,श्री. देविदास घेवारे (अप्पर पोलिस अधीक्षक) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती ,परिक्षेत्र अमरावती तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम येथील श्री. गजानन शेळके (पोलिस उप अधीक्षक ला. प्र.विभाग वाशिम) यांचे मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. कार्यवाही दरम्यान काल रिसोड येथे हिंगोली नाका परिसरातील स्टेट बँकसमोर रोख रक्कम ९,००० रुपये आरोपीने प्रत्यक्ष स्वीकारले असता तपास अधिकारी श्री. महेश भोसले (पोलिस निरीक्षक ला. प्र.विभाग वाशिम) यांनी कार्यवाही पथकातील पोहवा नितीन टवलारकर , पोहावा अशिफ शेख , पोहावा राहुल व्यवहारे , पोहावा विनोद मारकंडे , पोलिस नाईक योगेश खोटे , पोलिस नाईक रवींद्र घरत , चालक पोलिस शिपाई शेख नावेद यांच्यासह आरोपीला रंगेहाथ पकडून सापळा यशस्वीरीत्या पार पाडून आरोपीला ताब्यात घेतले.
Comments
Post a Comment