जांभूळधरा येथे टाटा सामाजिक विज्ञान संस्थान,मुंबई ने केला अभ्यास दौरा.

 जांभूळधरा येथे टाटा सामाजिक विज्ञान संस्थान,मुंबई ने केला अभ्यास दौरा.

-----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

मंगेश तिखट 

-----------------------------------------

कोरपना - टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुबई द्वारे जांभूळधरा परिसर व परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास दौरा करण्यात आला.

 जांभूळधरा    येथे अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६. नियम २००८ व सुधारित नियम, २०१२ नुसार  वन हक्क मान्य करणे या कायद्याने २०१८  मध्ये सामूहिक वन हक्क अधिकार अंतर्गत ६६३.९४  हेक्टर क्षेत्र मंजूर करण्यात आले आहे. कलम ५ आणि कलम ३(१)(झ) नुसार अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वन निवासी यांना "निरंतर वापर करण्यासाठी  पारंपारिकरित्या संरक्षण व संवर्धन करण्यात आलेल्या कोणत्याही सामाजिक वन स्त्रोतांचे संरक्षण, पुनर्निर्माण, संवर्धन किंवा व्यवस्थापन करण्याचा हक्क" प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन निर्णय ६ जुलै २०१७ च्या अनुषंगाने सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीला अनुसूचित जमातीचे वन निवासी व इतर पारंपारिक वन निवासी यांच्या फायद्यासाठी अश्या सामूहिक वन संपत्तीचे निरंतर व समसमान व्यवस्थापन, संवर्धन, व्यवस्थापन करण्यासाठी वन विभागाच्या सूक्ष्म योजना किंवा चालू योजना , व्यवस्थापन योजना बरोबर फेरबदलानिशी एकत्रीकरण करण्याचे अधिकार प्रदान केलेले आहे.त्याच संदर्भाने या अभ्यास दौऱ्यात चर्चा करण्यात आली. दाव्यात प्राप्त झालेल्या जंगल भागाची प्रत्यक्ष पाहणी करून वन विकाससाठी करायचा कामाची चर्चा करण्यात आली तसेच उपाजिवकेच्या साधनान मध्ये वाढ व्हावी या उद्देशाने नैसर्गिक पर्यटन स्थळं विकसित करण्याचा निर्णय गावकरी व समितीच्या लोकाकडून घेण्यात आला. दाव्यात प्राप्त क्षेत्राचे सीमांकन करून देण्याबाबत तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. आणि सामूहिक वन व्यवस्थापन समितीचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची विनंती करण्यात आली. या बैठकीत सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,ग्रामस्थ व तहसीलदार कोरपना, बीडीओ कोरपना,  प्रो. गीतांजोय साहू अमोल कुकडे ,जगदिश डोळसकर( संशोधन अधिकारी), राहुल बनसोडे नितीन ठाकरे, प्रवेश सुटे टाटा सामाजिक विज्ञान संस्थान,मुंबई  हे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.