व्हॉलीबॉल मध्ये मुरगूड विद्यालय उपविजेता.
व्हॉलीबॉल मध्ये मुरगूड विद्यालय उपविजेता.
--------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------
तालुकास्तरीय शालेय स्पर्धा
कागल तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत चौदा वर्षे वयोगटात येथील मुरगूड विद्यालय (ज्युनि कॉलेज) च्या संघाने उपविजेते पद पटकावले.मुरगूड येथे उत्साहात या स्पर्धा पार पडल्या.विविध गटात सुमारे ३५ संघांनी सहभाग घेतला होता.
मुरगूड विद्यालयाचा पहिला सामना कागल येथील जयसिंगराव घाटगे हायस्कूल बरोबर झाला. यामध्ये सर्वच खेळाडूंनी सांघिक कामगिरी केल्याने मुरगूड विद्यालयाने सलग २५-१७, व २५-१९ अशा गुण फरकाने विजय मिळवला आणि पुढील फेरीत प्रवेश केला.त्यानंतर कागल मधील यशवंतराव घाटगे हायस्कूल झालेल्या सामन्यात ही सलग दोन सेट मध्ये पराभव केला.२५-२०,व २५-१९ अशा फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम सामन्यात दिशा अकॅडमी एम आर पाटील स्कूल बाचणी यांच्या बरोबर अटीतटीची लढत झाली पहिला सेट अगदी दहा गुणांच्या फरकाने घेत सामन्यावर पकड घेतली दुसऱ्या सेट मध्ये १९-२५ अशा फरकाने बाचणी संघाने आगेकूच केली तिसऱ्या निर्णायक सेट मध्ये ११-१५ अशा फरकाने बाचणी ने सेट घेतल्याने मुरगूड विद्यालयाला उपविजेते पद मिळाले.
विजेत्या संघात नैतिक पाटील,वरद घाटगे,अथर्व पाटील,साहिल गोरुले,विकास हळदकर,हर्षल वरपे,आयुष मोरबाळे,धैर्यशील रणवरे,आयुश गोधडे,अभिषेख जाधव,शौर्य शेणवी,आचल कांबळे, यांचा समावेश होता.त्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर चे सचिव प्रा.जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानी ताई देसाई उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत चेअरमन मंजिरी मोरे देसाई, युवा नेते दौलतराव देसाई कोजीमाशीचे संचालक बाळ डेळेकर ,प्राचार्य एस आर पाटील,उपमुख्याध्यापक एस बी सूर्यवंशी, उपप्राचार्य एस पी पाटील,पर्यवेक्षक सुधाकर निर्मळे, प्रशिक्षक अनिल पाटील,एस एस कळत्रे,एम एच खराडे,मुरगूड व्हॉलीबॉल असोसिएशन यांचे मार्गदर्शन लाभले.
तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत उपविजेत्या संघासमवेत प्राचार्य एस आर पाटील,एस बी सूर्यवंशी,एस पी पाटील,एस एच निर्मळे,अनिल पाटील आदी.
Comments
Post a Comment