वारसाना डावलून भुसंपादन जमीनीचे पैसे लाटले पोलीसात तक्रार.

 वारसाना डावलून भुसंपादन जमीनीचे पैसे लाटले पोलीसात तक्रार.   

-----------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

मंगेश तिखट 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 

----------------------------------------------

 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 बी राजुरा गोविंदपुर या मार्गासाठी मौजा नांदा शिवारातील शेत सर्वे क्रमांक 140 शेतजमिनीच्या रस्ते कामाकरिता  4.81 आर    जमिनीपैकी काही जमीन भूसंपादन करून अवार्ड पारित करण्यात आला याबाबत भूसंपादन अधिकारी यांनी ताबा प्रक्रिया   व वारसदारांचे शपथपत्र नोटरी करून   सादर करण्याकरिता संबंधीचा सूचना केल्या वडीलोपार्जित जमिनीचे बहिणी हे वारसदार असताना बनावटी कागदपत्र व खोटे शपथपत्र सादर करून तसेच साक्षीदार स्वतः हजर नसताना त्यांच्या साक्षदार म्हणून नाव नोंदवून निशाणी आंगठे लावण्यात  आले  ते चुकीचे व बनावट आहेत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 बी जमीन प्रकरण क्रमांक 18 अ_65 / 2०l7, 2o I8निवाडा दि, ३०-६-२०२१ नुसार भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी आदेश पारित केला त्यानुसार जमिनीचा मोबदला रक्कम पाच वारसांना समसमान ठरले असताना  बहिणीची कोणतीही संमती न घेता संपूर्ण रक्कम पुतण्या मोतीराम कुडमेथे यांनी बनावटी दस्तावेज तयार करून संमती व वारसदारांची दिशाभूल करून शेत जमिनीचा मोबदला   41 लक्ष 94 हजार 327 रुपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वतःच्या खात्यात जमा केले तसेच जमिनीचा वाद व मोबदला मिळवण्यासाठी म्हणून वारसदाराकडून आधार कार्ड पासपोर्ट फोटो घेतल्याने त्याचा दुरुपयोग गैर अर्जदारांनी केल्याची तक्रार गोदुबाई मेश्राम तानी बाई मळावी   कमलबाई कुडमेथे यांनी उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्याकडे जमीन मोबदला देताना फसवणूक झाल्याचा तसेच आमच्या संमतीशिवाय वडिलोपार्जित जमिनीचा मोबदला  हडपल्याची व बनावट दस्तऐवज वापर करून फसवणूक केल्याची तक्रार ठाणेदार पोलीस स्टेशन कोरपणा यांच्याकडे गोदुबाई व त्यांच्या हक्कदार वारसांनी पोलिसात केली असून या प्रकरणाचा सकल चौकशी करून फसवणूक करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी केली आहे

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.