गांधीनगरात रंगणार प्रतिष्ठेची लढत.पाटील -महाडिक गटाला अपक्षांची आव्हाने ग्रामपंचायत निवडणुकीवर जिल्ह्याचे लक्ष.
गांधीनगरात रंगणार प्रतिष्ठेची लढत.पाटील -महाडिक गटाला अपक्षांची आव्हाने ग्रामपंचायत निवडणुकीवर जिल्ह्याचे लक्ष.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
गांधीनगर;-पश्चिम महाराष्ट्रातील अग्रेसर मानल्या जाणाऱ्या गांधीनगर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजल्याने रणधुमाळी सुरू झाली आहे. लोकनियुक्त सरपंच पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून बारा उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर 17 जागेसाठी 56 उमेदवार आपलं नशीब आजमावण्यासाठी रिंगणात उतरले आहेत.त्यामुळे या निवडणुकीला चांगलीच रंगत आली आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील पुरस्कृत जय झुलेलाल विकास मंच विरुद्ध महाडिक गटाचा गांधीनगर एकता मंच, व भारतीय सिंधू सभा यांच्यातच खरी लढत होणार आहे. या आघाड्यांना मात्र काही बंडखोर,व अपक्ष उमेदवारांचे ही तगडे आव्हान असणार आहे.
गांधीनगर ग्रामपंचायत स्थापनेनंतर पहिल्यांदाच सरपंच पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. गांधीनगर मध्ये सहा प्रभाग असुन 18 जागेसाठी 10602 मतदार आपला कौल देणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या गांधीनगर ग्रामपंचायत मध्ये आपल्या गटाची सत्ता येण्यासाठी जिल्हा नेत्यासह कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे . आपल्याच गटाचा सरपंच आणि सदस्य संख्या वाढवण्यासाठी दोन्ही गटासह अपक्षांनी कंबर कसली आहे. दोन्ही आघाड्यांनी आणि अपक्षांनी विजयी होण्यासाठी अनेक रणनीत्या अखून बेरजेचे राजकारण कसे करता येईल याचे छुपे डावपेच आखले आहेत. सत्ताधारी सतेज पाटील गटाने केलेल्या विकास कामाच्या जोरावर तर विरोधी महाडिक गटाने गांधीनगर सुधारित विकास कामावर सत्ता देण्याची अपेक्षा मतदाराकडे करत आहेत. एकूणच गांधीनगर ग्रामपंचायत निवडणुकीत अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
एकूण प्रभाग 6
सदस्य संख्या 17
लोकनियुक्त सरपंच 1
मतदार संख्या 10602
चौकट 1
सरपंच पद-अनुसूचित जातीसाठी आरक्षित
सरपंच पदाचे संभाव्य उमेदवार
सतेज बंटी पाटील गटाकडून जय झुलेलाल विकास मंचचे सुरेश शंकर लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली. तर भारतीय सिंधू सभा आणि भाजपाकडून संदीप हिंदुराव पाटोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सरपंच पदासाठी 10 उमेदवार अपक्ष त्यांची नावे अशी
लक्ष्मण उर्फ आप्पासाहेब संगप्पा कांबळे, गणेश वसंत देवकुळे, राजाराम विष्णू टोमके, भारत राजाराम कांबळे, विलास नाना चंदनशिवे, राजू दशरथ कांबळे, लता पांडुरंग शिरोलीकर, हिरालाल केशव गळीयल, विठ्ठल कृष्णा पवार, रामचंद्र सदाशिव अवघडे,
चौकट 2:- गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महाडिक गटाचे दहा उमेदवार निवडून आले. भारतीय सिंधू सभेच्या अपक्ष उमेदवार लोकनियुक्त सरपंच म्हणून रितू लालवानी या विजय झाल्या. त्यांना भाजपाच्या पूनम परमानंदांनी व बंटी पाटील गटाच्या शालिनी अंबाला यांनी विरोधात निवडणूक लढवली होती. पुढे रितू लालवानी यांनी महाडिक गटात प्रवेश केला. तर उपसरपंच म्हणून रितू उर्फ सोनी सेवलानी यांची निवड करण्यात आली. त्यांनी साडेतीन वर्ष महाडिक गटाचे सरपंच उपसरपंच म्हणून कार्यभार सांभाळा. मात्र सरपंच रितू लालवानी या सरपंच पदाला अपात्र झाल्या . मा.ना. बंटी पाटील गटात उपसरपंच रितू उर्फ सोनी सेवालानी यांनी प्रवेश केल्याने गांधीनगर ग्रामपंचायतीवर सतेज पाटील गटाचा प्रभारी सरपंच झाला. त्यामुळे गेली दीड वर्ष बंटी पाटील गटाची सत्ता स्थापन होऊन प्रभारी सरपंच म्हणून सोनी सेवालानी कार्यभार पाहत होत्या.
Comments
Post a Comment