गुजरात मधून आणलेले सिंह उद्या सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात सोडणार.

 गुजरात मधून आणलेले सिंह उद्या सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात सोडणार.


--------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

मंगेश तिखट          

--------------------------------------------

गुजरात मधून आणलेली सिंहांची जोडी उद्या मंगळवारी सहा डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात वनमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सोडण्यात येणार आहेत. 

ही सिंहांची जोडी काही दिवसांपूर्वी गुजरातेतील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून मुंबईत दाखल झाली आहे. हे दोन्ही सिंह प्रत्येकी दोन वर्षे वयाचे आहेत. मुंबईतील वातावरणाशी परिचित होण्यासाठी काही काळ जाऊ देण्यात आला होता. आता त्यांना मुंबईतील वातावरणाची पुरेशी सवय झाल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात त्यांना सोडण्यात येणार आहे. हे सिंह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाल्याने येथील बंद पडलेली सिंह सफारी पुन्हा सुरू होणार आहे. 

ही सिंहांची जोडी अवघ्या दोन वर्षांची असल्याने पुढील अनेक वर्षे सिंह सफारीचा आनंद पर्यटकांना घेता येईल तसेच या सिंहांच्या पुढच्या पिढ्याही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात निर्माण होतील असा विश्वास ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. 

भारतीय स्टेट बँकेने हे सिंह देखभालीसाठी दत्तक घेतले आहेत. ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हे सिंह देखभालीसाठी दत्तक घेण्याची सूचना बँकेला केली होती. ती तातडीने बँकेने स्वीकारल्या बद्दल वनमंत्र्यांनी बँकेचे कौतुक करत आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.