गडमुडशिंगी प्रा.आ. केंद्राकडून वळीवडेत तपासणी मोहीम पाच तापाचे रुग्ण आढळले
गडमुडशिंगी प्रा.आ. केंद्राकडून वळीवडेत तपासणी मोहीम पाच तापाचे रुग्ण आढळले.
-----------------------------------------------------------------------------------वळीवडे (ता. करवीर) येथे वाढत्या तापाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गडमुडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी मोहीम राबवली. तपासणीअंती या परिसरात पाच तापाचे रुग्ण आढळून आले.#
वळीवडे येथे बेघर वसाहत व मेघराज कॉलनी परिसरात चिकनगुनिया, हिवताप, डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण वाढत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते आकाश पोवार यांनी दिली होती. याबाबत गडमुडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रिझवाना मुल्ला यांनी तातडीने वळीवडे येथे तपासणी मोहिम राबवली. घरोघरी जाऊन आरोग्य सेवक राकेश घोडके व त्यांचे सहकारी आशा सेविका यांच्या पथकाने १०४ घरांची तपासणी केली. त्यातील पाच घरे प्रादुर्भावित आढळली. तेथे तापाचे पाच रुग्ण आढळले. मात्र ते चिकनगुनियाचे नसून हिवतापाचे होते, असे तपासणीत दिसून आले. जे पाण्याचे कंटेनर दूषित आढळले त्यात टेमीकॉसचा वापर आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला. तपासणी मोहिमेच्या वेळी माजी उपसरपंच सुहास तामगावे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. या मोहिमेचा अहवाल गडमुडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रास सादर करण्यात आला.#
Comments
Post a Comment