झिल मध्ये वार्षिक परितोषिक वितरण समारंभ संपन्न.

 झिल मध्ये वार्षिक परितोषिक वितरण समारंभ संपन्न.

--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------

  झिल इंटरनॅशनल स्कुल व ज्युनियर कॉलेज मध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध क्रिकेटपटू व  प्रशिक्षक मा. श्री. आनंद तांबवेकर व प्रो कबड्डीचा स्टार खेळाडू रोहित बन्ने हे मान्यवरासह स्कुलचे डायरेक्टर मा. श्री. संजय महाडिक सर उपस्थित होते.  यावेळी मनोगत व्यक्त करताना आनंद तांबवेकर यांनी विद्यार्थ्यांना खेळामध्ये यश मिळवण्यासाठी कष्ट, सातत्य आणि चिकटीची गरज असल्याचे सांगितले. या गुणांच्या बळावरच उत्कृष्ट दर्जाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होऊ शकतात हे उदाहरणांसह स्पष्ट केले. तसेच प्रो कबड्डीचा खेळाडू रोहित बन्ने यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व सांगितले व आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची गरज असल्याचे बोलले . शालेय स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान मानचिन्ह,पदक व सन्मानपत्र देऊन करण्यात आले. 

 या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचं गुणगौरव करण्यासाठी झिल इंटरनॅशनल स्कुल व ज्युनियर कॉलेजच्या प्रिन्सिपल सौ. मेघाली नरगच्चे मॅडम,ऍडमिनीस्ट्रेटिव ऑफिसर श्री. अभय भिलवडे सर , स्कुल कोऑर्डीनेटर श्री. जावेद नदाफ सर , प्रि प्रायमरी इनचार्ज श्रीमती. सविता भोसले मॅडम व प्रि प्रायमरी कोऑर्डीनेटर सौ. वंदना भिलवडे मॅडम हे उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक श्री जावेद नदाफ सर यांनी केले तर आभार सपना गावडे मॅडम यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.