कुपवाडला पत्रकार दिन,दिनदर्शिका प्रकाशन उत्साहात...
कुपवाडला पत्रकार दिन,दिनदर्शिका प्रकाशन उत्साहात...
----------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------
कुपवाड शहर पत्रकार संघ व स्नेहजित प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथे पत्रकार दिन व स्नेहजित दिनदर्शिकेचे प्रकाशन असा संयुक्त समारंभ उत्साहात झाला. तमाशासम्राट बाबूराव कुपवाडकर खुले नाट्यगृहात समारंभ झाला. कुपवाड मधील ज्येष्ठ नागरिक भूपाल कवठेकर प्रमुख पाहुणे होते. नगरसेवक शेडजी मोहिते यावेळी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्नेहजित प्रतिष्ठानचे सचिव स्नेहल गौंडाजे यांनी स्वागत केले. स्नेहजित प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कुपवाड शहर पत्रकार संघाचे संस्थापक सन्मती गौंडाजे यांनी प्रास्ताविक केले.
त्यांनी कुपवाडमधील पत्रकारितेची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. स्वातंत्र्यपूर्व काळात सत्यवादीसारखे दैनिक कुपवाडमधूनच प्रकाशित होत होते, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन श्री.भूपाल कवठेकर, श्री. शेडजी मोहिते. निवृत्त पोलिस नेमगोंडा पाटील, महावीर कोथळे यांच्या हस्ते करण्यात आले. पत्रकार सर्वश्री अब्दुलगणी मुजावर, सुभाष पाटील, बाळासाहेब मलमे, प्रवीण मिरजकर यांचा सत्कार पत्रकार दिनानिमित्त यावेळी करण्यात आला. स्नेहजित प्रकाशनच्या ‘स्नेहजित 2023’ या दिनदर्शिकेचे प्रकाशनही नगरसेवक शेडजी मोहिते, कवठेकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशन संस्थेमार्फत गेली सतरा वर्षे कुपवाडमध्ये दिनदर्शिका प्रकाशित केली जाते. या दिनदर्शिकेमध्ये ‘कुपवाड विशेष’ सदरातून कुपवाडचा इतिहास मांडलेला आहे. कुपवाड व परिसरात ही दिनदर्शिका मोफत दिली जाते असे श्री. गौंडाजे यांनी सांगितले. यावेळी दिनकर लोकरे, बाळासाहेब दानोळे, विशाल व्होनमोरे, यांच्यासह विविध नागरिक उपस्थित होते
Comments
Post a Comment