उद्योगरत्न आण्णासाहेब उपाध्ये सर अमृत महोत्सवी वर्ष समिती मार्फत हळदी–कुंकू, तिळगुळ वाटप व कराओके गायन कार्यक्रम उत्साहात संपन्न...

उद्योगरत्न आण्णासाहेब उपाध्ये सर अमृत महोत्सवी वर्ष समिती मार्फत हळदी–कुंकू, तिळगुळ वाटप व कराओके गायन कार्यक्रम उत्साहात संपन्न...

 -------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड व अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली)  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भारतीय उद्योगरत्न आण्णासाहेब उपाध्ये सर यांच्या  अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 11 वा उपक्रम हळदी–कुंकू, तिळगुळ वाटप, शेकोटी व  कराओके गायन असा कार्यक्रम अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल,कुपवाड च्या क्रींडागणामध्ये रविवार, दि. 15 जानेवारी 2023 रोजी सायं. 6 वा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सत्कारमुर्ती आण्णासाहेब उपाध्ये, कुपवाडच्या नगरसेविका सविता मोहिते, पद्मश्री पाटील, माजी नगरसेविका रंजना व्हनकडे यासह बामणोली गावच्या लोकनियुक्त सरपंच गीताताई चिंचकर यांचेसह संस्थेचे सचिव रितेश शेठ, संचालक बाळासाहेब कोथळे, वाढदिवस कमिटीतील राजेंद्र पवार, रघुनाथ सातपुते, 


अरूण तात्या रूपनर, किशोर शितोळे गुरुजी, बबनराव कागले यांचेसह सर्व विभागातील मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक,शिक्षक-शिक्षिका,विद्यार्थी- पालक मोठ्या संख्येने सहभागी होते. कार्यक्रमात प्रथम उपस्थित पाहुण्यांची ओळख व स्वागत हायस्कुलचे मुख्याध्यापक शिरीष चिरमे यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणातून केले. संगीत कार्यक्रमात प्रायमरीचे मुख्याध्यापक कुंदन जमदाडे यांच्या सह शिक्षक पालक व विद्यार्थी यांच्यासह महंमद रफी फेम इम्तियाज सिलेदार यांच्या गायनाने  कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रामाच्या मध्यंतरी उपस्थीत पाहुण्यांच्या हस्ते शेकोटी पेटविन्यात आली. शेकोटी नंतर सर्वांनी आणलेल्या भोजनाचा आस्वाद घेण्यात आला. 

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.