करवीर मध्ये उपसरपंच पदाच्या निवडी बिनविरोध! तर उचंगाव -ग्रामपचायतीमध्ये सतेज पाटील गटाचे विराग करी विजयी!
करवीर मध्ये उपसरपंच पदाच्या निवडी बिनविरोध! तर उचंगाव -ग्रामपचायतीमध्ये सतेज पाटील गटाचे विराग करी विजयी!
उपसरपंच वसगडे .सौ अनिता सोनवणे
-------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------
गांधीनगर उपसरपंच पुनम परमानंदाणी
गांधीनगर :गांधीनगरच्या उपसरपंचपदी भाजप-भारतीय सिंधू सभा पुरस्कृत गांधीनगर एकता मंचच्या पूनम परमानंदाणी यांची निवड झाली. त्या महाडिक गटाच्या आहेत. त्यांनी जय झुलेलाल विकास मंचच्या (बंटी पाटील गट) विनोद हजुराणी यांचा नऊ विरुद्ध आठ मतांनी पराभव केला. एक मत बाद झाले. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच संदीप पाटोळे होते.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप- भारतीय सिंधू सभा पुरस्कृत गांधीनगर एकता मंचने लोकनियुक्त सरपंचपदासह ९ जागा जिंकून सत्तांतर घडवले. या आघाडीचे संदीप हिंदुराव पाटोळे ३ हजार २५० मतानी विजयी झाले.
विरोधी जय झुलेलाल विकास मंचचे सुरेश लोखंडे मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले होते.
वळिवडे (ता.करवीर) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी राजर्षी शाहू विजयी आघाडीचे (बंटी पाटील गट) शरद नवले यांची निवड झाली. त्यांनी युवा शेतकरी विकास आघाडी व राजर्षी शाहू संयुक्त आघाडीच्या सौ. स्वाती इंगवले यांचा १० विरुद्ध ७ मतानी पराभव केला. त्या महाडिक गटाच्या आहेत. एक मत बाद झाले. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी
सरपंच सौ रुपाली रणजीतसिंह कुसाळे होत्या.
ग्रामपंचायतच्या अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत राजर्षी शाहू विजयी आघाडीने सरपंचपदासह नऊ जागा जिंकून सत्तारूढ युवा शेतकरी विकास आघाडी व राजर्षी शाहू संयुक्त आघाडीला हादरा दिला व सत्तांतर घडवले. सरपंच पदाचे उमेदवार सौ. रूपाली कुसाळे यानी ७०८ मतांनी विद्यमान लोकनियुक्त सरपंच अनिल पंढरे यांच्या पत्नी सौ. संगीता पंढरे यांचा पराभव केला होता. उपसरपंच निवड सभेला एका अपक्षासह सर्व सदस्य उपस्थित होते.
उंचगाव.तालुका करवीर उंचगाव च्या उपसरपंच पदी् विराग पंढरीनाथ करी हे विजयी झाले आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टी च्या उमेदवार सौ अनुराधा वांईगडे याचा 14विरुध्द 3 मतानी पराभव केला लोक नियुक्त सरपंच मधुकर चव्हाण हे अध्यक्ष स्थानी होते
वडणगे.ता.करवीर.येथील उपसरपंच पदी् बाबूराव नांगरे यांची बिनविरोध निवड झाली त्यावेळी अध्यक्ष स्थानी लोकनियुक्त सरपंच सौ.सगीता शहाजी पाटील होत्या.
वसगडे ता.करवीर येथे उपसरपंचपदी स्थानिक ग्रामविकास आघाडी व बंटी पाटील गटाच्या अनिता सुदर्शन सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच योगिता बागडी होत्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विश्वास सुतार, ग्रामविकास अधिकारी जी डी गिरीगोसावी, डी वाय धनगर, व माजी सरपंच नेमगोंडा पाटील, डॉ. श्रीकांत चौगुले, सुदर्शन सोनवणे, तंटामुक्त अध्यक्ष शशिकिरण हेरवाडे, नूतन सर्व ग्रा.प. सदस्य उपस्थित होते.
काही अपवाद वगळता करवीर मधील उपसरपंच पदाच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत
Comments
Post a Comment