गोडोली येथे अतिक्रमणामुळे वाहतुकीचा बोजवारा.
गोडोली येथे अतिक्रमणामुळे वाहतुकीचा बोजवारा.
-------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------
सातारा येथील गोडोली येथे नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमणे वाढली आहे. शासनाने नुकतीच सर रूंदीकरण करुनही दररोज गोडोली साईबा मंदिर तसेच जकात नाका परिसरात अतिक्रमणे बोकाळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका तसेच पोलिस प्रशासन यांनी संयुक्तपणे अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबवली पाहिजे. मुळात गोडोली जकात नाका ते साईबाबा मंदिर परिसरात सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी पाच ते आठ यावेळी दुचाकी, चारचाकी वाहने वेगाने धावत असतात. तसेच येणाऱ्या पादचारी यांना अतिक्रमण वाढल्याने जिव मुठीत धरून वाट काढावी लागते.सदर ठिकाणी जकात नाका येथील अरूंद रस्ते व पुल यामुळे प्रचंड गर्दी होत असते. म्हणून येथील नागरिकांची मागणी आहे की, नगरपालिका, पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी मोहीम राबवुन अतिक्रमणे काढावीत अन्यथा रस्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती आमचें सातारा प्रतिनिधी किरण अडागळे यांना दिली.
Comments
Post a Comment