संत बाळुमामांच्या नावाखाली राजरोसपणे मेंढरे खात आहेत शेतकऱ्यांची उभी पिके... शेतकरी हवालदिल.
संत बाळुमामांच्या नावाखाली राजरोसपणे मेंढरे खात आहेत शेतकऱ्यांची उभी पिके... शेतकरी हवालदिल.
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे
---------------------------------------------------------------------
देवावरील श्रद्धा व्यक्त करण्याचे अनेक माध्यमे असून काही लोक अनेकांचे नुकसान करून देवावरील प्रेम व्यक्त करतात याचा प्रयत्न सध्या सरवडे परिसरात असणाऱ्या आणि बाळूमामा देवाच्या नावाखाली शेतातील उभी पिके चालणाऱ्या काही महापुरुषांच्या व महाभक्तांच्या माध्यमातून उघडपणे राजरोस चालू आहे आधीच कोरोना सारख्या महाभयंकर संकटामुळे सर्वसामान्य शेतकरी माणूस मेटाकुटीस आला आहे त्यात तर शेतकऱ्याची अवस्था अतिशय दयनीय आहे त्यातच भरीत भर म्हणून उसासारखे पीक हे लहान असताना जोमात वाढण्याची वेळ असते अशा अवस्थेत त्यात जर बकरी चारून त्या त्या पिकाची जर नासधूस केली तर त्या शेतकऱ्याचे प्रचंड असे नुकसान होते शेतकरी गैरहजर असताना त्या शेतकऱ्याच्या शेतात जर अशा पद्धतीने बकरी चारणे हे काय योग्य आहे काय अशा पद्धतीने देवाच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवून केलेले पिकाचे नुकसान भरून निघणार आहे का आणि अशा पद्धतीने बकरी चारणे ही परवानगी किंवा हा अधिकार देवस्थान समितीने दिला आहे काय हा खरा प्रश्न उभा राहतो अशा पद्धतीने बकरी पाळणे आणि ती गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बिनधास्तपणे न विचारता चारणे हे योग्य नाही हा प्रकार सरवडे गावामध्ये बरेच दिवस झालं राजरोसपणे पाहायला मिळत आहे ही बकरी चारणारी लोक आणि बकरी निर्ढावल्यासारखे लोकांच्या अंगावर येतात आणि उलट देवाचा आहे असं सांगून प्रत्युत्तर करतात देवाच्या नावाखाली बकरी पाळायची ती कुणाच्यातरी शेतात चारायची आणि ती कोणत्यातरी व्यापाऱ्याला नेऊन विकायची आणि देवाच्या नावाखाली आपल्या तिजोरी भरण्याचा धंदा सुरू आहे आणि याकडे समाजाने डोळसपणे पाहायला हवे तरी सदर देवस्थान समिती व देवस्थान समिती मधून आलेल्या बकरी चारणाऱ्या लोकांवर सदर शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान पाहून त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्यांचे झालेले नुकसान भरपाई करून द्यावी असे शेतकरी मागणी करत आहेत तसेच यामध्ये जे जे लोक सामील आहेत त्या सर्वांच्या वरती थेट गुन्हे नोंद करून कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून केली जात आहे
श्रध्दा असावी पण डोळस असावी,अंधळी श्रध्दा माणसाला मानसिक गुलाम बनविते.भक्तीच्या नावाखाली धुडगूस घालण्यामध्ये अशिक्षितांच्याही पेक्षा सुशिक्षित(?) लोकांची मोठी झुंड मोठी आहे.. श्रध्दा असावी पण डोळस असावी,अंधळी श्रध्दा माणसाला मानसिक गुलाम बनविते.भक्तीच्या नावाखाली धुडगूस घालण्यामध्ये अशिक्षितांच्याही पेक्षा सुशिक्षित(?) लो चकांची मोठी झुंड मोठी आहे. ज्या श्रध्देनं कपाळ भरुन भंडारा लावला जातो,तोच पवित्र भंडारा मिरवणूकीत पायदळी तुडविला जातो.याचा विचार करणार का? अलीकडे तर बकरी मिरवणूकीत उडत्या चालीची गाणी डॉल्बीवर लावून हिडीस नृत्य डोळ्यांचे पारणे फेडत आहेत.अश्लील, बिभित्स हवभाव अंतकरणातील भावनेला तडे देत आहेत. भर रस्त्यामध्ये तरुण,तरुणी व वयोवृध्द स्त्रिया आपल्या रिती-भाती,परंपरा,संस्कृतीला मुठमाती देवून बहोश होवून बेधुंद होवून नाचगाण्यात रममान झालेल्या पाहिल्या की मनाला खूप वेदना होतात. भक्तीचा मांडलेला खुला बाजार आपली सदसद विवेकबुद्धी गहाण टाकत आहे.आज गावोगावी या झुंडी निर्माण होत आहेत.आमचा गरीब माय-बाप शेतकरी रांत्रदिन घाम गाळून शेतात पीक पिकवत आहे.पण हे लोक देवाच्या नावाखाली उभे पीक फस्त,नायनाट करत चालले आहे.माझा राजा शिवछत्रपतीने देखील आपल्या सैन्याला मोहिमेवर जातांना शेकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले होते." शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नया,पागेसाठी (घोडा) वैरण हवी असेल तर विकत घ्या.त्यासाठी खजिन्यातून व्यवस्था केली जाईल!" अशी नितीचे धडे देणाऱ्या राजेंच्या विचारांचे स्वतःला पाईक समजत असाल तर माझ्या माय-बाप शेतकऱ्यांचे पीक वाचवा...आणि खरचं तुमची श्रध्दा असेल तर तो परमेश्वर तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही. शेवटी एवढेच सांगेन की, संत-महात्म्यांच्या पराभवाला त्यांचे असे तथाकथित अनुयायीच जबाबदार असतात.संतांच्या विचारांचा पोथीवाद निर्माण न करता ते विचार मस्तकात घुसवून विवेकी वर्तन करावे एवढीच माफक आपेक्षा!
Comments
Post a Comment